एक्स्प्लोर
Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण
ऐतिहासिक राम मंदिर (Ayodhya Ram Mandir ) भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत मात्र याआधी एक चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे. भूमिपूजनाच्या तयारीच्या गडबडीत याठिकाणी कोरोनाची एंट्री झाली आहे. राम जन्मभूमीच्या पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोना झाल्याची माहिती आहे.
![Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण Ayodhya Ram Mandir Priest tests corona positive ahead of Bhoomi Pujan on 5 August Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/19011720/ram-mandir.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अयोध्या: ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहोचणार आहेत. या कार्यक्रमाला 200 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी साधू, संत, अधिकारी, नेता, विहिप- न्यास यांच्या व्यतिरिक्त देशातील 50 विशेष अतिथी सहभागी होणार आहेत. मात्र याआधी एक चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे. भूमिपूजनाच्या तयारीच्या गडबडीत याठिकाणी कोरोनाची एंट्री झाली आहे. राम जन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास (Priest Pradeep Das) यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. ते मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. प्रदीप दास देखील सत्येंद्र दास यांच्यासह राम जन्मभूमीची पूजा करतात. राम जन्मभूमीमध्ये मुख्य पुजाऱ्यांसह अन्य चार पुजारी रामललाची सेवा करतात.
राम जन्मभूमीच्या सुरक्षेतील 16 पोलिसांना कोरोनाची लागण
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुजारी प्रदीप दास यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राम जन्मभूमीच्या सुरक्षा व्यवस्थेतील 16 पोलिस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या आधी पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढल्याने खळबळ उडाली आहे.
Exclusive | राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रम कसा असणार? किती जण उपस्थित राहणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येला
ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर 5 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता अयोध्येतील साकेत महाविदयालयाच्या पटांगणात उतरेल. यानंतर ते पहिल्यांदा हनुमान गढीला किंवा राम जन्मभूमीकडे जातील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. परंतू सध्या चर्चा अशी आहे की, राम जन्मभूमीच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तास संबोधन करणार आहेत. ज्याचं प्रसारण अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रिन लाऊन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येपासून फैजाबादपर्यंत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मंत्रच्चोर ऐकू येणार आहे.
Ram Mandir Ayodhya | राम मंदिरासाठी चांदीच्या विटा नको, पैसे द्या, राम मंदिर ट्रस्टचं लोकांना आवाहन
शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन
सकाळी राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर रात्री शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्येत मोठं मोठे कटआऊट लावण्यात येणार आहेत. हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक सोहळा करण्यासाठी आता भाजपकडून मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचं अयोध्येत येतं आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विशेष अतिथिच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी प्रत्येक खुर्चीमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हँडग्लोज, मास्क आणि सँनिटायझर वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सध्या राम मंदिर ट्रस्टकडून कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक ते सर्व सुरक्षेचे उपाय अयोध्येत करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
राम मंदिर भूमिपूजनाची वेळ अशुभ; शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती याचं निवेदन
राममंदिराचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करा, उद्धव ठाकरेंचा सल्ला
काहीच न करता रामजन्मभूमीसाठी आम्हीच सर्वकाही केल्याचा दावा, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)