(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakhi Sawant | राखी सावंतवर बनणार बायोपिक? जावेद अख्तर यांनी व्यक्त केली इच्छा
अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या जीवनावर तयार करण्यात येणाऱ्या बायोपिकसाठी (Biopic) बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक जावेद (Javed Akhtar) अख्तर यांनी स्क्रिप्ट लिहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुंबई: बीग बॉसच्या अंतिम फेरीतून बाहेर पडलेल्या अभिनेत्री राखी सावंतच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्यात येणार आहे. तसा दावा राखी सावंतने केला आहे. या गोष्टीला लेखक जावेद अख्तर यांनीही पुष्टी दिलीय. त्यामुळे आता लवकरच राखी सावंतचे जीवन प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे.
जावेद अख्तर यांनी स्पॉटबॉय ला दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट सत्य असल्याचं सांगितलंय. ते म्हणाले की, "राखी सावंत जो दावा करतेय तो सत्य आहे. चार-पाच वर्षापूर्वी आम्ही एका फ्लाइटमध्ये भेटलो होतो. त्यावेळी राखीने आपल्या लहानपणीच्या आठवणींबद्दल आपल्याला सांगितलं होतं. त्यावेळी मी तिला सांगितलं होतं की मी एक दिवस तुझ्या आयुष्यावर आधारित स्क्रिप्ट लिहेण. हे ऐकल्यानंतर राखी सावंत खूप एक्सायटेड झाली होती."
राखी सावंत आणि तिच्या भावाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
जावेद अख्तर यांनी केला राखी सावंतला कॉल राखी सावंतच्या जीवनावर असा बायोपिक तयार झाला तर त्याची स्क्रिप्ट जावेद अख्तर लिहतील आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शन हे फरहान अख्तर करेल असं सांगण्यात येतंय. राखी सावंतने या आधी असा दावा केला होता की जावेद अख्तर यांनी तिला कोरोना सुरु व्हायच्या आधी एक कॉल केला होता आणि त्यावेळीही सांगितलं होतं की तिच्या जीवनावर बायोपिक लिहायचा आणि आणि त्यासाठी भेटायचं आहे.
राखी सावंत म्हणाली की, "जावेद अख्तर यांच्या कॉलनंतर ती त्यांना भेटू शकली नाही. पण माझे जीवन खूप वादांनी भरलेलं आहे आणि देशातील लोक ते पाहतील का, ते पसंत करतील का असा सवाल आहे."
राखीला ज्यावेळी विचारले की या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीने भूमिका साकारायला हवी. त्यावेळी राखी सावंत म्हणाली की, "आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोन या अभिनेत्रींनी भूमिका साकारली तर चांगलं वाटेल. त्याशिवाय करीना कपूरही या अभिनयासाठी उत्तम आहे. या सर्व अभिनेत्री माझ्या आवडत्या आहेत."
सलमान खानने केलेल्या मदतीबद्दल राखी सावंतच्या आईने मानले आभार, पाहा व्हिडीओ