एक्स्प्लोर
VIDEO : ट्रेनमध्ये दारु पिऊन टीसीची दादागिरी, घटना कॅमेरात कैद
राजकोट : ट्रेनमध्ये दादागिरी करणाऱ्या टीसीचे प्रताप कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गुजरातमधील राजकोटमध्ये रविवारी ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सुदीप्ती नीरज सिंग या महिलेनं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.
स्वराज एक्स्प्रेसमध्ये टीसी चक्क दारु पिऊन प्रवाशाला त्रास देत होता. टीसी आणि त्यांचे साथीदार पँन्ट्री कोचमध्ये दारु पित बसले होते. एका ज्येष्ठ नागरिकाकडून टीसीनं एक हजार रुपये उकळल्याचाही आरोप आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार रेल्वे अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाही ट्वीट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता या टीसीवर प्रभू काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
https://twitter.com/NeerajS54032036/status/881713864026587137
https://twitter.com/NeerajS54032036/status/881715076037836800
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement