एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वे आता ‘स्मार्ट’ होणार, कोचमध्ये ‘सेन्सर’ बसवणार
कोचमध्ये सेन्सर बसवण्यासाठी जवळपास 15 लाख रुपयांचा खर्च येतो, मोठ्या स्वरुपात सेन्सर बसवण्यास सुरुवात केल्यानंतर 15 लाखांवरुन कमी होत, 12 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.
नवी दिल्ली : ऑनलाईन पोर्टल असो, वा प्रवासादरम्यानच्या सुविधा असो, बदलत्या तंत्रज्ञानानुसार रेल्वे विभाग आपल्या रेल्वेसेवेत बदल करते. आज रेल्वेच्या ताफ्यात ‘स्मार्ट कोच’चा प्रवेश होणार आहे. कोचमध्ये एक असं सेन्सर असेल, ज्याद्वारे कोचमधील कोणत्याही समस्या रेल्वेच्या संबंधित विभागाला कळतील, आणि त्यानुसार प्रवाशांना सुविधा आणि सुरक्षा पुरवणं शक्य होईल.
रायबरेली येथील मॉडर्न कोच फॅक्टरीमध्ये देशातील पहिले ‘स्मार्ट कोच’ बनवले गेले असून, या कोचला ‘कोच विद द ब्रेन’ असेही म्हटले जाते. रेल्वे प्रशासनाने आज या ‘स्मार्ट कोच’बद्दल माध्यमांना माहिती दिली.
'स्मार्ट कोच'चे वैशिष्ट्य :
- रेल्वे रुळावर कुठे हिटिंग पॉईंट असल्यास, बेअरिंग कमकुवत झाली असल्यास आणि स्प्रिंग कमकुवत झाल्यास सेन्सर काही महिने आधीच तंत्रज्ञानाद्वारे सूचना करेल. त्यानुसार मग रेल्वे प्रशासन दुरुस्ती करुन, संभाव्य घटना रोखू शकते.
- या सेन्सरमुळे वेगवेगळ्या कोचमधील तापमान आणि प्रदूषण स्तराचीही माहिती मिळू शकेल.
- कोचमधील टँकमध्ये किती पाणी आहे, याची सुद्धा माहिती मिळेल.
- ‘स्मार्ट कोच’मध्ये हॉट-स्पॉट असे, ज्याद्वारे रेल्वेचं अप चालू शकेल. या अपमध्ये रेल्वेचं इन्फोन्टमेंट अपचाही समावेश आहे.
- प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्कसाठी एंटिना सुद्धा कोचमध्ये असेल.
- सेन्सर कंट्रोल रुमला सातत्याने मेसेज करत राहील, जो मेसेज रेल्वेच्या पुढील स्थानकापर्यंतही पोहोचवला जाईल.
- सेन्सरमधील सर्व माहिती डेटा क्लाऊडवर साठवला जाईल, जो प्रसंगी उपयोगाचंही ठरेल.
‘स्मार्ट कोच’साठी किती खर्च?
एका कोचमध्ये सेन्सर बसवण्यासाठी जवळपास 15 लाख रुपयांचा खर्च येतो, मोठ्या स्वरुपात सेन्सर बसवण्यास सुरुवात केल्यानंतर 15 लाखांवरुन कमी होत, 12 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.
‘स्मार्ट कोच’ कधी सुरु होईल?
येत्या सप्टेंबर महिन्यात कैफियत एक्स्प्रेसच्या कोचमध्ये सेन्सर बसवण्यात येईल, त्यानंतर 100 इतर कोचमध्ये सेन्सर बसवण्यात येईल. हे अर्थात प्रायोगिक तत्त्वार असेल. त्यानंतर यात अधिक संशोधन करुन नवीन कोचमध्ये सेन्सर बसवण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement