एक्स्प्लोर

शिवरायांच्या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनातील कमतरता पूर्ण : कोविंद

राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली : छत्रपती शिवरायांची प्रतिमा मला आत्ता भेट दिली, या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनात जी कमतरता मला अनेकदा जाणवत होती ती पूर्ण झाली. अतिशय उत्कृष्ट अशी ही शिवरायांची प्रतिमा राष्ट्रपती भवनातच राहून या वास्तूची शोभा वाढवत राहील असे भावपूर्ण उद्गार देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. दिल्लीत प्रथमच साजऱ्या झालेल्या भव्य शिवजयंती सोहळ्यात कोविंद बोलत होते. शिवजयंतीचा उत्साह रायगडापासून दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत पोहचवण्यासाठी यंदा प्रथमच राजधानीत अशा भव्य शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी महाराष्ट्र सदनातून भव्य शोभायात्रा निघाली, त्यानंतर दिल्लीतल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम पार पडला. छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी दुसरं तिसरं कुणी नव्हे तर देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत, नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने या शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवरायांच्या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनातील कमतरता पूर्ण : कोविंद दरम्यान, आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी शिवरायांच्या नेतृत्वगुणांचं कौतुक केलं. केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात भारतीय इतिहासाला निर्णायक योगदान देणारे शिवाजी महाराज हे देशाच्या सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी एक होते असे उद्गार राष्ट्रपतींनी काढले. छत्रपती शिवरायांबद्दल जाणून घेताना एका व्यक्तिमत्वामध्ये इतके सगळे गुण कसे सामावू शकतात या विचारानंच आपण नतमस्तक होतो. केवळ युद्धकौशल्य नव्हे तर ते एक उत्तम राज्यशासक होते. आजच्या भाषेत बोलायचे तर सिस्टम बिल्डर म्हणजे नवी व्यवस्था निर्माण करणारे होते असे उद्गार राष्ट्रपतींनी काढले. दिल्लीसह आसपासच्या परिसरातून आलेले हजारो शिवप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमासाठीचं निमंत्रण अवघे काही दिवस उरलेले असताना दिले, मात्र त्यानंतरही राष्ट्रपतींनी यायचं कबूल केलं, याबद्दल खासदार संभाजीराजे यांनी त्यांचे आभार मानले. इतक्या कमी वेळात आपला प्रोटोकॉल बाजूला ठेवून, त्यातून वेळ काढत ते आले, यातूनच त्यांना शिवरायांबद्दल किती आदर आहे हे स्पष्ट होतं असं संभाजीराजे म्हणाले. शिवाय देशात शिवजयंती हा राष्ट्रीय उत्सव करण्याची विनंती त्यांनी यावेळी राष्ट्रपतींना केली.

संबंधित बातम्या :

मोदी ते बिग बी... दिग्गजांकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा

राजधानीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शिवजयंतीचा भव्य सोहळा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget