MV Ganga Vilas: जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ गंगा विलास प्रवासासाठी सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा
MV Ganga Vilas: पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी सकाळी वाराणसी येथे जगातील सर्वात लांब नदी क्रूझ-MV गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
Worlds Longest River Cruise-MV Ganga Vilas: पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी सकाळी वाराणसी येथे जगातील सर्वात लांब नदी क्रूझ-MV गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच या कार्यक्रमादरम्यान ते 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इतर अनेक देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील करणार आहेत.
गंगा विलास क्रुझ...62 मीटर लांब...12 मीटर रुंद...तीन ओपन हॉल..फाईव्हस्टार हॉटेल्सच्या सर्व सुविधा. 18 स्पेशल सुविधांससह विशेष खोल्या...तसेच प्रवाशी आणि क्रु मेंबर्ससह 71 जणांसाठीची खास सोय..हीच गंगा विलास क्रुझ आता 51 दिवसांच्या ऐतिकहासिक प्रवासासाठी सज्ज झाली आहे. वाराणसीच्या काठावरुन ही क्रुझ 13 तारखेला निघेल...त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील...पहिल्या फेरीसाठी 31 विदेशी प्रवासी यातून प्रवास करतील..
क्रूझचा प्रवास कसा असेल?
13 जानेवारी रोजी ही क्रुझ वाराणसीतून निघेल..पुढे बिहारच्या पाटण्यातून पश्चिम बंगालच्या दिशेनं जाईल..त्यानंतर बंगालच्या उपसागरातून बांगलादेशात पोहोचेल..पुढे लहान मोठ्या नद्यांमधून गंगा विलास क्रुझ आसाममध्ये पोहोचेल..भारत आणि बांगलादेशामधील 5 राज्यातून ही क्रुझ जाणारय....आणि गंगा, यमुनेसह 27 नद्यांमधून 3 हजार 200 किलोमीटर अंतर पार करेल..आणि हीच सेवा 13 जानेवारीपासून सुरु होईल.. त्याचीच माहिती आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथाही दिली..दरम्यान, यामुळे जलवाहतूक आणि पर्यटनाला नवी गती मिळेल, असा विश्वास खुद्द पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला होता..
पंतप्रधानांचं ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीटमध्ये म्हणाले की, गंगा विलास हे जगातील सर्वाधिक लांबीचे नदीमधील नौकापर्यटन ( cruise) म्हणजे आपल्या सांस्कृतिक मुलाधारांशी जोडून घेण्याची अनोखी संधी आहे आणि भारताच्या विविधतेतील सुंदर पैलू शोधण्याची अनोखी संधी आहे.
This is a unique opportunity to connect with our cultural roots and discover beautiful aspects of India’s diversity. https://t.co/zylIIgRMdO
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2023
एक भारत श्रेष्ठ भारत..असा संदेश या गंगा विलास क्रुझच्या माध्यमातून दिला जाईल..असा विश्वास भाजपला आहे..तर विरोधकांनी मात्र यावर टीका केलीय .वाराणसीतील नाविकांचा रोजगार हिरवला जाईल..असा आरोप अखिलेश यादवांनी केलाय. आरोप सुरु झालेत..तिकडे क्रुझच्या प्रवासाची तयारी पूर्ण झालीय. त्यामुळे 13 तारखेला हा प्रवास सुरु होईल..आणि भारताच्या जलवाहतुकीच्या इतिहासात नवा अध्याय जोडला जाईल..
एमव्ही गंगा विलास
एमव्ही गंगा विलास उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून आपला प्रवास सुरू करेल आणि भारत, बांगलादेशातील 27 नदी प्रणाली ओलांडून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढला पोहोचण्यासाठी 51 दिवसांत सुमारे 3,200 कि.मीचा प्रवास करेल. एमव्ही गंगा विलासमध्ये सर्व लक्झरी सुविधांसह 36 पर्यटकांच्या क्षमतेचे तीन डेक आणि 18 सुइट्स आहेत. गंगा विलासच्या पहिल्या प्रवासाच्या संपूर्ण कालावधीसाठी स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक सहभागी होणार आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट सुविधा जगासमोर आणण्यासाठी एमव्ही गंगा विलास क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या 51 दिवसांच्या प्रवासात ही रिव्हर क्रुझ जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट तसेच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. या प्रवासामुळे पर्यटकांना भारत आणि बांगलादेशातील कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्मात सहभागी होण्याची आणि शानदार प्रवास अनुभवण्याची संधी मिळणार आहे.