PM Modi : कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान जम्मू-काश्मीरमध्ये, 20 हजार कोटींच्या योजनांचं लोकार्पण
PM Modi Jammu Kashmir Tour : कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये जाणार आहेत. ते येथे सुमारे 20 हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
PM Modi Jammu Kashmir Tour : कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये जाणार आहेत. पंतप्रधान मोदी आज जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 20 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. यामध्ये दोन केंद्रशासित प्रदेशांना जोडणाऱ्या बनिहाल-काझीगुंड रोड बोगद्याच्या उद्घाटनाचाही समावेश आहे. आज राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या खास प्रसंगी पंतप्रधानांनी हा दौरा ठरवला आहे. या विशेष प्रसंगी ते सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार असून देशभरातील ग्रामसभांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संबोधित करतील. पंतप्रधानांच्या हस्ते 'अमृत सरोवर' नावाचा नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 जलस्रोतांचा विकास आणि पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान जम्मू-काश्मीरसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा अनेक विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत.
- देशातील सर्व 700 ग्रामसभांना संबोधित करणार
- सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीला भेट देणार
- डिजिटल माध्यमातून 322 पंचायतींना बक्षिसाची रक्कम देणार
- प्रत्येक जिल्ह्यातील 75 जलकुंभांच्या विकासाशी संबंधित 'अमृत सरोवर'चे लोकार्पण
- 20 हजार कोटींच्या विकास योजनांचा शुभारंभ आणि पायाभरणी
- बनिहाल-काझीगुंड रोड बोगद्याचे उद्घाटन
- दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेच्या तीन रस्त्यांच्या पॅकेजची पायाभरणी
- रॅटले आणि क्वार जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी
सुरक्षा कर्मचारी हाय अलर्टवर
पंतप्रधानांच्या या दौऱ्याबाबत सुरक्षा कर्मचारी हाय अलर्टवर आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी जम्मूमध्ये सुरक्षा दलांनी एक मोठी दहशतवादाचा कट उधळून लावली होती. सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यामध्ये लष्कराचा एक अधिकारीही शहीद झाला असून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. रॅलीच्या ठिकाणापासून 8 किमी अंतरावर रविवारी सकाळी जम्मूमध्येही एक संशयास्पद स्फोट झाल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Kisan Yojana : मोठी बातमी! पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता लवकरच मिळणार, जाणून घ्या कोणत्या दिवशी येणार पैसे?
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचं 'पाकिस्तान कनेक्शन', शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर हल्ले वाढले!
- Russia Ukraine War : रशियाच्या क्रूरतेचं धक्कादायक वास्तव, युक्रेनच्या मारियुपोलमध्ये सापडली सामूहिक कबर, 1000 मृतदेह असण्याचा अंदाज
- Sri lanka : आर्थिक संकटात श्रीलंकेला दिलासा, जागतिक बँकेची मिळणार मदत