(Source: Poll of Polls)
PM Kisan Yojana : मोठी बातमी! पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता लवकरच मिळणार, जाणून घ्या कोणत्या दिवशी येणार पैसे?
PM Kisan Scheme : तुम्ही पंतप्रधान किसान योजनेमध्ये नोंदणी केली असेल आणि 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 11व्या हप्त्याचे 2000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
PM Kisan Samman Nidhi Yojana : तुम्ही पंतप्रधान किसान योजनेमध्ये (PM Kisan Scheme) नोंदणी केली असेल आणि अकराव्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 11व्या हप्त्याचे 2000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. हे पैसे कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात येऊ शकतात ते जाणून घ्या.
खात्यात पैसे कधी येणार?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. एप्रिल ते जुलै दरम्यान देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याचे पैसे जमा होतात. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे हे पैसे मे महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात.
1 जानेवारी रोजी मिळाला होता दहावा हप्ता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. यावेळी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा करण्यात आले.
पीएम किसान योजनेत नोंदणी करा
- पंतप्रधान किसान योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
- येथे तुम्हाला होम पेजवर 'Farmer Corners' पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणीचा पर्याय निवडा.
- अर्जात सर्व माहिती भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.
वर्षाला सहा हजारांचा लाभ
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. यामध्ये प्रत्येकी 2000 रुपयांचे तीन हप्त्यांच्या स्वरुपात पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
पैसे न मिळाल्यास खाली दिलेल्या क्रमांकांवर तक्रार करा
- पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
- पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
- पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401
- पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
- पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109
- ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचं 'पाकिस्तान कनेक्शन', शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर हल्ले वाढले!
- Sri lanka : आर्थिक संकटात श्रीलंकेला दिलासा, जागतिक बँकेची मिळणार मदत
- Viral Video : अचानक आकाशातून समुद्रात कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ
- Viral : माकडाकडून तीन वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, पुढे काय झालं पाहा...