एक्स्प्लोर
आदरणीय पंतप्रधान, तुमची परीक्षेची तयारी कुठवर आलीय?, मोदींचं उत्तर...
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर मोदींनी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांशी परीक्षेसंदर्भात संवाद साधला. देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. यावेळी दिल्लीतील एका विद्यार्थ्याने निवडणुकींच्या अनुशंगाने परीक्षेचा एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला मोदींनीही अगदी हटके उत्तर दिले.
विद्यार्थ्याचा प्रश्न...
दिल्लीतील जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी इयत्तेत शिकणाऱ्या गिरीश सिंह या विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून प्रश्न विचारला, “आदरणीय पंतप्रधान, मला वाटतं पुढल्या वर्षी आपली दोघांचीही परीक्षा आहे. कारण आमची 12 वीची परीक्षा आणि तुमची लोकसभेची निवडणूक. तुमची पुढल्या वर्षीच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण झालीय का? की तुम्ही नर्व्हस आहात?”
पंतप्रधान मोदींचं उत्तर...
गिरीशच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींनी अत्यंत हटके उत्तर दिले. मोदी उत्तरात म्हणाले, “जर मी तुझा शिक्षक असतो, तर तुला पत्रकारिता करण्यासाठी सूचवलं असत. कारण असे फिरकी घेणारे प्रश्न विचारण्याची सवय पत्रकारांना असते.”
याच प्रश्नाला उत्तर देताना पुढे मोदी म्हणाले, “राजकारणातही मी अशा सिद्धांतानुसार काम करतो की, माझ्याकडे जी ताकद आहे, सामर्थ्य आहे, वेळ आहे, ते सारं सव्वाशे कोटी जनतेसाठी अर्पण करतो. निवडणुका येतील आणि जातील.”
दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मेकिंग एक्झाम फन चॅट विद पीएम मोदी’ या कार्यक्रमात मोदी बोलत होते. त्यावेळी तिथल्या एका विद्यार्थ्याने मोदींना विचारलेल्या प्रश्नावर मोदींनी उत्तर दिलं. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर मोदींनी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मोदींनी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवादही साधला आणि तणावाच्या व्यवस्थापनाबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement