PM Modi's Brother Hospitalized : पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; किडनीसंबंधित आजाराने ग्रस्त
Prahlad Modi Hospitalized : पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
![PM Modi's Brother Hospitalized : पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; किडनीसंबंधित आजाराने ग्रस्त PM Modis Brother Prahlad Modi Hospitalized due to Kidney Problem Check Details PM Modi's Brother Hospitalized : पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; किडनीसंबंधित आजाराने ग्रस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/31/020ee2785760d14cd0adbfefc43d5174_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Narendra Modi's Brother Prahlad Modi Hospitalized : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे बंधू प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रल्हाद मोदी हे मृतपिंडासंबंधित आजाराने ग्रस्त आहेत. प्रल्हाद मोदी पंतप्रधान मोदी यांचे लहान भाऊ (PM Narendra Modi's Brother Hospitalized) आहेत. त्यांच्यावर सध्या चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात किडनी संबंधित आजारावर उपचार सुरु आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी रुग्णालयात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी (Prahlad Modi Hospitalized) यांना किडनीशी संबंधित उपचारांसाठी चेन्नईतील (Chennai) अपोलो रुग्णालयात (Apolo Hospital) दाखल करण्यात आलं आहे. प्रल्हाद मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा वयाने दोन वर्षांनी लहान आहेत. प्रल्हाद मोदी यांचे निवासस्थान अहमदाबादमध्ये आहे.
PM Modi's younger brother Prahlad Modi has been hospitalised due to kidney problems.https://t.co/FksZ4foNiE
— ABP LIVE (@abplive) February 28, 2023
Who is Pralhad Modi : कोण आहेत प्रल्हाद मोदी?
प्रल्हाद मोदी हे पंतप्रधान मोदी यांचे बंधू आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबात त्यांच्यासह एकूण पाच भावंडं आहेत. प्रल्हाद मोदी हे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा लहान असून ते भावंडांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. प्रल्हाद मोदी हे अहमदाबादचे आहेत. अहमदाबादमध्ये प्रल्हाद मोदी यांचं किराणामालाचं दुकान आणि टायरचं शोरूम आहे.
याआधी प्रल्हाद मोदी 2018 साली चर्चेत आले होते. त्यांनी गुजरातमध्ये आंदोलन केलं होतं. गुजरात फेअर प्राइज शॉप आणि केरोसिन लायसेंस होल्डर्स यांच्यामध्ये वाद झाला होता. हा वाद निवळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर प्रल्हाद मोदी यांनी बंद पुकारला होता, त्यावेळी ते गुजरात फेअर प्राइज शॉप ओनर्सचे अध्यक्ष होते.
पंतप्रधान मोदी यांना पाच भावंडं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबात एकूण पाच भावंडं आहेत. त्यापैकी एक बहीण आणि चार भाऊ आहेत. सोमा मोदी, अमृत मोदी, नरेंद्र मोदी, प्रल्हाद मोदी, पंकज मोदी आणि एक बहीण वासंती मोदी. पंतप्रधानांच्या मोठ्या भावाचं नाव सोमा मोदी आहे. ते आरोग्य विभागातून निवृत्त झाले असून अहमदाबादमध्ये वृद्धाश्रम चालवतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)