PM Modi Interview : गेल्या 50 वर्षात कॉंग्रेसने देशाच्या विभाजनाचे काम केले, पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
PM Modi Interview : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचं जिंकणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे.
PM Modi Interview : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी संसदेत जे भाषण केले त्यावरून देशात आरोप-- प्रत्यारोपांच राजकारण सुरू झाले. आज एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आरोपांना उत्तर देताना पुन्हा एकदा कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. गेल्या 50 वर्षात कॉंग्रेसने देशाचं फक्त विभाजन केले आहे. प्रत्येक राज्यात घराणेशाहीचा पक्ष असून, घराणेशाही पक्ष फक्त घराण्याचा विचार करतात देशाचा नाही.
संसदेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना पंतप्रधान नरेंद्र म्हणाले, मी कोणाच्या आजोबांवर, वडिलांवर किंवा आईवर टीका केलेली नाही. देशाच्या पंतप्रधनाचे ते विचार मी मांडले. तेव्हाच्या पंतप्रधाचे विचार आणि आजच्या पंतप्रधानांचे सध्याच्या परिस्थितीवर हे विचार होते. हा संपूर्ण देशातील नागरिकांचा हक्क होता. मला वारंवार म्हटले जाते की, तुम्ही देशाचे माजी पंतप्रधान नेहरुंचे नाव घेत नाही. आता घेत आहे तर लोकांना अडचण येत आहे. आता मला कळत नाही. जी व्यक्ती ऐकूनच घेत नाही, संसदेत फिरकत नाही, त्याला मी उत्तर कसे देऊ?
लखीमपुर खीरी (Lakhimpur Kheri) प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुप्रिम कोर्टाला जी कमिटी हवी होती, त्याला राज्य सरकारने सहमती दिली होती. ज्या न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली तपास होणार होता त्याला देखील राज्य सरकारने परवानगी दिली होती. राज्य सरकार पारदर्शक पद्धतीने काम करत आहे
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचं जिंकणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा विधानसभा निवडणूक होणार आहे. प्रधानमंत्री पुढे म्हणाले, भाजप पाच राज्यात विजयी होणार आहे आणि पूर्ण बहुमताने निवडणूक जिंकणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
PM Modi Interview : पाच राज्यांमध्ये भाजपचाच विजय होणार, पंतप्रधान मोदींचा दावा
नेहरूंना त्यांच्या प्रतिमेची चिंता... म्हणून गोवा 15 वर्षे पारतंत्र्यात; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल