PM Modi Instructs To Ministers : अर्थसंकल्पाचा पुरेपूर वापर करुन सर्व योजना गरजूंपर्यंत पोहोचवा, पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना
सर्व मंत्र्यांनी सांघिक भावनेने काम करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. तसेच सर्व मंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा पुरेपूर वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत.
PM Modi Instructs To Ministers: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी मंत्र्यांना काही सूचना केल्या आहेत. सर्व मंत्र्यांनी सांघिक भावनेने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच एकमेकांच्या मंत्रालयाची माहिती ठेवा. सर्व मंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा पुरेपूर वापर करुन सर्व योजना गरजूंपर्यंत पोहोचवाव्यात. तसेच प्रत्येक 6 आठवड्यांनी सर्व मंत्र्यांनी एकमेकांना भेटावे जेणेकरुन आपापसात समन्वय राहील, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधुवारी संध्याकाळी उशिरा मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची मॅरेथॉन बैठक घेतली. सुमारे साडेतीन तास ही बैठक चालली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. बुधवारी झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर सरकारच्या विविध मंत्रालयांनी सादरीकरण केले. यामध्ये यावर्षीच्या अर्थसंकल्पातील घोषणा आणि त्यांची अंमलबजावणी, अमृत सरोवर योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव बांधण्याचे उपक्रम, त्याची क्षमता वाढवणे आणि स्वायत्त संस्थांमधील सुधारणा यांचा समावेश आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना अर्थसंकल्पाशी संबंधित घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी एक टीम म्हणून काम करण्याचे आवाहन केले. स्वतःच्या मंत्रालयाव्यतिरिक्त इतर मंत्रालयांची धोरणे जाणून घेण्याच्या सुचना पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना केल्या आहेत. प्रत्येक गरजूला सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी अर्थसंकल्पात सर्व मंत्रालयांसाठी तरतूद केलेल्या अर्थसंकल्पाचा पुरेपूर वापर करावा, असे पंतप्रधान म्हणाले. या संदर्भात, पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना दर सहा आठवड्यांनी एकमेकांना भेटत राहण्याची सूचना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Taj Mahal Controversy : भगव्या कपड्यांमुळे ताजमहाल पाहण्यास केली बंदी, सद्गुरू परमहंसाचार्यांचा दावा; अधिकाऱ्यांनी मागितली माफी
- 'भाजपशासित राज्यात विद्वेष वाढतोय, आपण लक्ष घाला', माजी सरकारी अधिकाऱ्यांचं पंतप्रधानांना पत्र
- Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांची यादी काढून पंतप्रधानांनी सुनावलं