PM Modi : वेळीच बदला, अन्यथा बदल होत राहतात! पंतप्रधान मोदींचा भाजप खासदारांना इशारा
Parliament Session : एकच गोष्ट सातत्याने सांगायला भाग पाडू नका, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित रहा अशा कडक शब्दात पंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना सुनावलं आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासंबंधी पक्षाचं धोरण ठरवण्यासंबंधी पक्षाच्या खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत अनुपस्थित राहणाऱ्या भाजपच्या खासदारांना फटकारलं. मुलांना वारंवार फटकारलं तर त्यांनाही ते आवडत नाही. त्यामुळे तुम्ही बदला, अन्यथा बदल होत राहतात, अशा शब्दांत पंतप्रधानांनी खासदारांची खरडपट्टी काढली आणि इशाराही दिला.
संसदेच्या अधिवेशनात कोणत्याही खासदारानं अनुपस्थित राहू नये असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावलं आहे. पक्षाच्या सर्व खासदारांनी अधिवेशनात सक्रिय भूमिका बजावावी असंही ते म्हणाले आहेत.
एकच गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगायला लावू नका
भाजपचे खासदार अधिवेशनाच्या काळात संसदेत अनुपस्थितीत राहतात असं लक्षात आल्यानंतर मोदींनी पक्षाच्या खासदारांची शाळा घेतली. एकच गोष्ट सातत्याने सांगायला भाग पाडू नका असा कडक शब्दात पंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना खडसावलं आहे. मुलांना वारंवार फटकारलं तर त्यांनाही ते आवडत नाही. त्यामुळे तुम्ही बदला, अन्यथा बदल होत राहतात, अशा शब्दांत पंतप्रधानांनी खासदारांची खरडपट्टी काढली.
दरम्यान, संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरुन मोठं राजकारण करण्यात आलं. दिल्लीच्या रस्त्यांवर ऑक्सिजनचे टॅन्कर फिरत राहिले पण त्याचा राज्याकडून त्याचा वापर करण्यात आला नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ऑक्सिजनच्या अभावी झालेल्या मृत्यूंची संख्या पंजाब व्यतिरिक्त कोणत्याही राज्याने दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
संबंधित बातम्या :
- ऑक्सिजनवरुन राजकारण, राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृतांची आकडेवारी दिली नाही; केंद्राचा राज्यांवर निशाणा
- Parliament Session : राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, 'सरकार सत्याला घाबरतं'
- Yahoo Search Engine : इंटरनेटच्या सर्चमध्येही मोदी अव्वल स्थानी, ममता बॅनर्जी, आर्यन खानचाही यादीत समावेश
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
