Parle Biscuits Price Hike : महागाईची झळ, पार्ले-जी बिस्किटही महागलं
Parle Biscuits Price Hike : पार्ले-जी कंपनीने आपलं सर्वात लोकप्रिय ग्लुकोज बिस्टिकाच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.
Parle Biscuits Price Hike : पेट्रोल-डिझेलची दरवाढ सध्या स्थिर असली तरीही इतर गोष्टींच्या किंमती वाढत आहेत. कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. त्यातच आता पार्ले-जी कंपनीनेही बिस्किटांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. पार्ले कंपनीने आपल्या प्रोडक्टवर पाच ते 10 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. पार्ले कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं मंगळवारी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, साखर, गहू आणि तेल यासारख्या कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळेच कंपनीने बिस्किटाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
दहा टक्क्यांपर्यंत वाढल्या किंमती :
पार्ले कंपनीचा सर्वात लोकप्रिय ग्लुकोज बिस्किटाची किंमत आता सहा ते सात टक्क्यांनी महागली आहे. त्यासोबतच कंपनीने टोस्ट आणि केकच्या किंमती अनुक्रमे पाच – दहा आणि 7 ते 8 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. बिस्किटांमध्ये पार्ले-जी, हाइड अण्ड सिक आणि krackjack यासारख्या लोकप्रिय पदार्थांचा समावेश आहे.
किंमत नाही बदलणार, वजन घटणार –
पार्ले प्रोडक्टचे वरिष्ट अधिकारी मयंक शाह म्हणाले की, आम्ही किंमतीमध्ये पाच ते 10 टक्क्यांची वाढ केली आहे. कंपनीने 20 रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे बिस्किट आणि अन्य उत्पादनाच्या किंमती वाढवल्या आहेत. किंमती व्यवस्थित स्थिर ठेवण्यासाठी बिस्किटाच्या पाकिटाचे वजन घटवलं आहे.
पार्ले कंपनीने किंमती का वाढवल्या?
उत्पादन शुल्कांमधील वाढणाऱ्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या मालाच्या किंमती सातत्याने वाढत आहे. याचा फटका कंपनीला बसत आहे. खाद्यतेलासारख्या साहित्याच्या किंमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 50-60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनीने आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
या आर्थिक वर्षातील पहिली वाढ :
पार्ले कंपनीकडून करण्यात आलेली यंदाच्या आर्थिक वर्षातील ही पहिली वाढ आहे. याआधी जानेवारी-मार्च 2021 या तिमाहीत कंपनीने आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवल्या होत्या. पण ही वाढ 2020-2021 या आर्थिक वर्षातील होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha