एक्स्प्लोर
Advertisement
केजरीवाल सरकारची हॅट्ट्रिक, सलग तिसऱ्या वर्षी ‘टॅक्स फ्री’ बजेट
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनोखी हॅट्ट्रिक साधली आहे. केजरीवाल सरकारने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी बजेट सादर केलं. दिल्लीचा हा सलग तिसरा बजेट आहे, जो ‘टॅक्स फ्री’ आहे. म्हणजेच कोणतेही नवे टॅक्स लावण्यात आले नाहीत किंवा सध्याच्या टॅक्समध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 48 हजार कोटी रुपयांचा बजेट विधानसभेत सादर केला. या बजेटमध्ये योजनांवरील खर्च मांडण्याची परंपरा मोडीत काढत महसुली खर्च आणि भांडवली खर्च अशा स्वरुपाचा बजेट तयार करण्यात आला.
सिसोदिया यांच्या म्हणण्यानुसार, नव्या बदलामुळे दर तीन महिन्यांनी आता सादर करण्यात आलेल्या बजेटचं समीक्षण करता येईल आणि खर्चाचं मुल्यांकनही केलं जाऊ शकतं.
शिक्षणावर अधिक खर्च
अरविंद केजरीवाल यांनी या बजेटमध्येही शिक्षणावर अधिक लक्ष दिलं आहे. बजेटचा 24 टक्के भाग म्हणजेच 11 हजार 300 कोटी रुपये केवळ शिक्षणासंदर्भातील योजना आणि इतर गोष्टींसाठी आहे. शिक्षणासंदर्भात केजरीवाल सरकारने बजेटमधून नव्या घोषणाही केल्या आहेत.
शिक्षणासंदर्भात नव्या घोषणा -
- सरकारी शाळांमध्ये 10 हजार नव्या खोल्या बनवणार
- शिक्षकांना टॅबलेट देणार
- मध्यान्ह भोजनासोबत केळं, अंडीही देणार
- नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही मध्यान्ह भोजन देणार
- शालेय गणवेशासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करणार
- संगणक कक्ष आणि ग्रंथालयांची संख्या वाढवणार
- प्रत्येक शाळेत उर्दू-पंजाबी क्लब उघडणार
- प्रत्येक शाळेत नृत्य शिक्षिकेची नियुक्ती करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement