NEET 2021 Date: पुढच्या आठवड्यात येऊ शकतं परीक्षेचं नवं वेळापत्रक, विद्यार्थ्यांचं निर्णयाकडे लक्ष
NEET परीक्षेसंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA)नं अजून अॅप्लिकेशन फॉर्म जारी केलेले नाहीत. पुढील आठवड्यापर्यंत या परीक्षेचं नवीन वेळापत्रक जारी केलं जाण्याची शक्यता आहे.
NEET Exam 2021: नीट (NEET) परीक्षेबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. अंडर ग्रॅजुएट मेडिकल कोर्सेसच्या अॅडमिशनसाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA)नं अजून अॅप्लिकेशन फॉर्म जारी केलेले नाहीत. पुढील आठवड्यापर्यंत या परीक्षेचं नवीन वेळापत्रक जारी केलं जाण्याची शक्यता आहे.
एनटीएनं अद्याप तरी परीक्षेसाठी अॅप्लिकेशन फॉर्म जारी केलेले नाही. मागील नोटिफिकेशननुसार ही परीक्षा एक ऑगस्ट रोजी आयोजित केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. अशात विद्यार्थी सध्या संभ्रमावस्थेत आहे. ही परीक्षा वेळेवर होणार की पुन्हा स्थगित करण्यात आली आहे, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यात नुकतच सोशल मीडियावर एक फेक नोटिस व्हायरल झाली होती. ज्यामध्ये परीक्षेची तारीख आणि अॅप्लिकेशन फॉर्मच्या तारखेसंदर्भात माहिती दिली होती. मात्र नंतर एनटीएनं ही नोटिस फेक असल्याचं सांगितलं होतं. परीक्षेचे अॅप्लीकेशन फॉर्म जवळपास 60 दिवस आधी जारी केले जातात कारण NTAला परीक्षा केंद्र, शिफ्ट ठरवणे आणि अॅडमिट कार्ड जारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. मागील महिन्यात एजंसीनं ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाऊ शकते असंही सांगितलं होतं.
एनटीएनं काय सांगितलं
एनटीएनं सांगितलं की, नीट यूजी परीक्षेची तारीख फायनल करण्यासाठी स्टेक होल्डर्सशी चर्चा सुरु आहे. परीक्षेची नवीन तारीख देशातील कोरोनाची परिस्थिती पाहून निश्चित केली जाईल.परीक्षेची वाट पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नवीन अपडेटसाठी एनटीएची अधिकृत वेबसाईट (nta.nic.in) आणि (ntaneet.nic.in) चा उपयोग करावा, असं आवाहन एनटीएकडून करण्यात आलं आहे.
कोण भरु शकतं नीट 2021 चा फॉर्म?
बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे मुख्य विषय घेऊन 12वी पास झालेले विद्यार्थी नीट परीक्षेसाठी अप्लाय करु शकतात. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल अद्याप आलेला नाही किंवा ओपन स्कूल तथा प्रायव्हेट मधून 12वी (10+2) परीक्षा पास केली आहे, ते विद्यार्थी देखील NEET UG Application Form भरु शकतात. यासाठी विद्यार्थ्याचे वय कमीत कमी 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असावं. आरक्षित वर्गांसाठी वयामध्ये पाच वर्षांची सवलत आहे.
लेटेस्ट अपडेट अधिकृत वेबसाईटवर
सर्व उमेदवारांना सल्ला देण्यात आला आहे की अद्ययावत माहितीसाठी NEET 2021ची अधिकृत वेबसाईट चेक करत राहावी. NEET अॅप्लिकेशन फॉर्म, शेड्युल, ब्रोशर, अॅडमिट कार्ड, आन्सर-की, निकाल आणि कट-ऑफ अशा सर्व महत्त्वाच्या घोषणा आणि अपडेट neet.nta.nic.in वरच जाहीर केले जातील.