एक्स्प्लोर

Medicines: घाऊक महागाईचा परिणाम; एप्रिलपासून अत्यावश्यक औषधं 10 टक्क्यांनी महागणार 

Essential Medicines: एप्रिल महिन्यापासून जीवनावश्यक 800 औषधांची किंमत वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

नवी दिल्ली: वाढत्या घाऊक महागाईचा परिणाम आता थेट औषधांवर होणार आहे. परिणामी एप्रिल महिन्यापासून जीवनावश्यक 800 औषधांची किंमत वाढणार आहे. रशिया-युक्रेन युद्ध, कोरोना, लॉकडाऊन या सगळ्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन्समधील (NLEM) जवळपास 800 औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या किमती अनेक वर्षांनी प्रथमच 10 टक्क्यांनी वाढणार आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) तीव्र वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे.

NELM मध्ये सूचीबद्ध औषधांची वार्षिक वाढ WPI च्या आधारावर आहे. या यादीमध्ये समाविष्ट असलेली औषधे अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीमध्ये गणली जातात आणि ती किरकोळ विक्रीव्यतिरिक्त सरकारच्या अनेक आरोग्य कार्यक्रमांसाठी म्हणजेच योजनांकरिता वापरली जातात.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागाराच्या कार्यालयानुसार, देशभरातील WPI महागाई जानेवारी 2021 मध्ये 2.51 टक्क्यांच्या तुलनेत जानेवारीमध्ये 12.96 टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल 2021 नंतर, ते दुहेरी अंकात राहिले.

अनुसूचित औषधे
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, निवडक औषधांच्या किमतीतील बदलांसाठी WPI हा आधार म्हणून घेतला जात असल्याने, या तीव्र वाढीचा परिणाम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणाऱ्या नवीन किमतींवर दिसून येईल.

आंतरिक पातळीवर चर्चा सुरू आहे आणि NELM मध्ये समाविष्ट असलेल्या औषधांच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक वाढू शकतात, कारण WPI आधार लक्षात घेणे आवश्यक आहे असं NPPA अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

NELM यादीमध्ये समाविष्ट असलेली औषधे ताप, संक्रमण, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचा रोग आणि अशक्तपणा यासारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. यामध्ये पॅरासिटामॉल आणि अॅझिथ्रोमायसिन यांसारख्या प्रतिजैविकांचा समावेश आहे जे बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरले जातात, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या अॅनिमिक प्रिस्क्रिप्शनचा समावेश होतो.

कोविड-19 च्या उपचारातही औषधांचा वापर केला जातो तर काही औषधे मध्यम ते गंभीर COVID-19 रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. तसेच त्यात प्रेडनिसोलोन सारख्या स्टिरॉइड्सचा समावेश होतो.

भारतीय बाजारपेठेत उपलब्ध सुमारे 6,000 फॉर्म्युलेशन शेड्यूल औषधे आहेत, याचा अर्थ ती किंमत नियंत्रणात आहेत किंवा त्यांची कमाल किरकोळ किंमत NPPA द्वारे निश्चित केली आहे. गेल्या काही वर्षांत, कोरोनरी स्टेंट आणि गुडघा रोपण यांसारखी अनेक वैद्यकीय उपकरणेही किमती नियंत्रणाखाली आणली गेली आहेत.

रुग्णांचा त्रास वाढणार
किमतीत मोठी वाढ तार्किकदृष्ट्या न्याय्य असली तरी त्यामुळे लोकांना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया रुग्ण हक्क गट असलेल्या ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कशी संबंधित चिनू श्रीनिवासन यांनी त्यानंतर दिली आहे

भूतकाळात अशी प्रकरणे घडली आहेत जेव्हा WPI मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे परंतु औषधांच्या किमती मोजण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे कारण WPI गणना ही वस्तूंच्या बास्केटच्या वाढीवर अवलंबून असते ज्याचा फार्मास्युटिकल उद्योगाशी थेट संबंध नसल्याचंही श्रीनिवासन यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती
सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Embed widget