एक्स्प्लोर
‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’
काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराची समस्या लष्कळी बळाने नाही तर काश्मीरी जनतेला समजून घेतल्याने सुटेल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात व्यक्त केलं

नवी दिल्ली: ‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तणावग्रस्त जम्मू काश्मीरवर भाष्य केलं.
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.
यावेळी काश्मीरबाबत मोदी म्हणाले, “दहशतवादाविरोधी लढ्यासाठी अनेक देश भारतासोबत आहेत. दहशतवाद कधीही खपवून घेतला जाणार नाही. मात्र काश्मीरचा प्रश्न हा ना गोळीने ना शिवीगाळीने सुटेल, गळाभेट हाच त्याला पर्याय आहे. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
याशिवाय एकीचं बळ हीच देशाची ताकद आहे. हा देश गांधी आणि बुद्धांचा आहे. इथे सर्वजण समान आहेत. न्यू इंडियाचं स्वप्न साकारण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, असंही मोदींनी नमूद केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
