एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Morning Headlines 3rd June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी

Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस (Coromondel Express) आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात (Coromondel Express Accident) झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 200 च्याही पार गेला आहे. तर, 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच, भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर 

2. हावडा एक्प्रेस आधी मालगाडीला धडकली; त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसवर मालगाडी आदळली... ओडिशा रेल्वे अपघाताची संपूर्ण कहाणी

Odisha Train Accident: ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasore) येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम संयुक्तपणे बचावकार्य करत आहे. वाचा सविस्तर 

3. ट्रेन क्रमांक 12841... 250 किमी धावल्यानंतर रुळावरून घसरली कोरोमंडल एक्सप्रेस, एका झटक्यात 233 जणांचा मृत्यू

Odisha Train Accident: ओडिशाच्या (Odisha) बालासोर (Balasore) जिल्ह्यात शुक्रवारी तीन रेल्वे ट्रेन्सची एकमेकांना धडक झाली. येथे बहनागा स्टेशनजवळ SMVB-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. प्रथम हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडलला धडकली. या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस पश्चिम बंगालमधील कोलकातामधील हावडा स्टेशन आणि तामिळनाडूमधील चेन्नई दरम्यान धावते. अपघात झाला तेव्हा रेल्वेत असणाऱ्या प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. वाचा सविस्तर 

4. Odisha Railway Accident : ओदिशा रेल्वे अपघातानंतर काही गाड्या मार्ग बदलले तर काही गाड्या रद्द, पाहा यादी

Odisha Train Accident : ओदिशातील बालासोर इथे काल (2 जून) रात्री झालेल्या एका मोठ्या रेल्वे अपघातात 207 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, अपघातानंतर या मार्गावरील काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या गाड्यांची यादी जारी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर 

5. Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात सुमारे 98 जणांचा मृत्यू, अमित शाहांच्या आवाहनानंतर नागरिकांकडून 140 शस्त्रास्त्रांचं समर्पण

Manipur Violence : मणिपूरमध्ये एका महिन्यापूर्वी उसळलेल्या हिंसाचारात सुमारे 98 जणांचा मृत्यू झाला आणि 310 जण जखमी झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. मणिपूर सरकारने 2 जून रोजी एका निवेदनात ही माहिती प्रसिद्ध केली आहे. सध्या 272 मदत छावण्यांमध्ये एकूण 37,450 लोक आश्रयाला आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्यात गेल्या महिन्यामध्ये हिंसाचार उफाळून आला होता. वाचा सविस्तर 

6. टाटा समूह गुजरातमध्ये 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, लिथियम आयन सेल प्रकल्प उभारणार

Lithium-Ion Cell Unit In Gujarat : टाटा समूह (Tata Group) गुजरातमध्ये 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. टाटा समूहाने गुजरात (Gujarat) सरकारसोबत एक सामंजस्य करार (MoU) केला आहे, ज्याअंतर्गत टाटा समूह राज्यात लिथियम आयन सेल (Lithium-Ion Cell) मॅन्युफॅक्चरिंग गिगा कारखाना उभारणार आहे. टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या अग्रतास एनर्जी स्टोअरेज सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने (Agratas Energy Storage Solutions Pvt Ltd) गुजरात सरकारसोबत हा करार केला आहे. वाचा सविस्तर 

7. Go First Flights Cancelled: गो फर्स्टच्या प्रवाशांनी लक्ष द्या! आता 'या' तारखेपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द

Go First Flights Cancelled: देशात स्वस्त विमानसेवा पुरवणाऱ्या GoFirst एअरलाइन्सनं स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केल्यानं भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये 3 मे रोजी स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केल्यानंतर कंपनीनं आपली सर्व उड्डाणं रद्द केली होती. आता या विमान कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अडचणीत असलेल्या GoFirst नं 7 जून 2023 पर्यंत सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. यापूर्वी कंपनीनं 4 जूनपर्यंत उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, आता कंपनीनं तारीख आणखी पुढे ढकलत उड्डाणं 7 जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर 

8. 3rd June In History: देशाचा भूगोल बदलला... भारताच्या फाळणीची घोषणा आणि गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन; आज इतिहासात 

3rd June In History: भारताच्या इतिहासाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी भारताचा इतिहास आणि भूगोल बदलला. 3 जून 1947 रोजी भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीची घोषणा लॉर्ड माउंटबॅटन यांनी केली. ही घटना 'थर्ड जून प्लॅन' किंवा 'माउंटबॅटन प्लॅन' म्हणून ओळखली जाते. तसेच राजकीय दृष्टीकोनातून आज एक दुर्दैवी घटना घडली असून आजच्याच दिवशी भाजचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झालं होतं. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या विस्ताराने जाणून घेऊया... वाचा सविस्तर 

9. Horoscope Today 03 June 2023 : मेष, तूळ, मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 03 June 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना आपल्या मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे काही नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. तर, वृषभ राशीची सगळी रखडलेली काममे पूर्ण होतील. तर, मीन राशीसाठी मात्र आजचा दिवस चांगला आहे. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल आजचा शनिवार? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget