एक्स्प्लोर

Horoscope Today 03 June 2023 : मेष, तूळ, मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 03 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 03 June 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना आपल्या मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे काही नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. तर, वृषभ राशीची सगळी रखडलेली काममे पूर्ण होतील. तर, मीन राशीसाठी मात्र आजचा दिवस चांगला आहे. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल आजचा शनिवार? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज जे तरूण नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांना नोकरी मिळण्याची संधी आहे. घरापासून दूर काम करणाऱ्या लोकांना आज आपल्या कुटुंबाची आठवण येईल. व्यवसाय करणारे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा आज तुमच्याबरोबर असेल. त्यांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.  तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. तुमची मानसिक शक्ती वाढवण्यासाठी ध्यान आणि योगासने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. व्यावसायिक भागीदारी सहकार्य करतील आणि एकत्रितपणे प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत ते व्यवसाय पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसतील. वडिलांचाही तुमच्या व्यवसायाला पाठिंबा असेल. आज मित्रांद्वारे तुमचे नवीन संपर्क वाढतील. आज कुटुंबीयांकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील त्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे.  आज प्रवासाला जाण्याचाही शुभ योग आहे. हा प्रवास तुमच्यासाठी महत्वाचा आणि आनंददायी असेल. आज तुम्ही तुमचे पैसे धार्मिक कार्यात गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचा चांगला सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज विद्यार्थ्यांच्या कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. शिक्षकांचेही सहकार्य मिळेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. बदलत्या हवामानामुळे तुमच्या आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि विश्रांती गरजेची आहे. आज तुम्ही कोणतीही गुंतवणूक करताना घाईघाईत निर्णय घेऊ नका. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन तुम्ही तुमची कामे पूर्ण करणं गरजेचं आहे. आज तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. गैरसमजाची भावना निर्माण होऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज नातेवाईकांबरोबर धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच फलदायी असणार आहे. आज ध्यान आणि योग तुमच्या शारीरिक आणि मानसिक फायद्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर आज कोणत्याही परिस्थितीत त्याची परतफेड करा. यामुळे तुमची आर्थिक बाजू थोडी कमकुवत होऊ शकते. पण, तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आजचा दिवस अधिक सुंदर आणि खास बनवण्यासाठी तुमच्या मुलांबरोबर थोडा वेळ घालवा. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडा. तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. प्रॉपर्टीचे व्यवहार करणाऱ्या लोकांना आज चांगला व्यवहार होऊ शकतो. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्त्रोत देखील प्राप्त होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचारही करू शकता. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरदार वर्गाला आज नोकरीत बढतीसाठी अधिकारीही मिळतील. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पालकांचे मत जाणून घ्या. आज कामाचा अतिरेक असला तरी कामाच्या ठिकाणी तुमची ऊर्जा दिसून येईल. व्यस्त दिनचर्येतही तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. वैवाहिक जीवनासाठी हा दिवस खास आहे. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. धाकट्या बहिणीच्या तब्येतीत सुधारणा होईल. सामाजिक उत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही कराल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात, ते यशस्वी होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांशी शेअर करा. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. एखादे काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर वेळ चांगली आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, दुकान, फ्लॅट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.  

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. आज तुमच्या इच्छाशक्तीला प्रोत्साहन मिळेल. आज शेजारच्यांच्या वादात पडणे टाळा. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद असेल, परंतु ओळखीच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने आज तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील मिळतील. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. आज मोकळ्या वेळेत स्वत:ची आवड जपा. कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करा. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज नाचेवाईकांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. तिथे थोडा वेळ घालवल्याने तुमच्या मनातील सगळे विचार दूर होतील आणि प्रसन्न वाटेल. भाऊ-बहिणीचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. जोडीदाराबरोबर काही कारणास्तव वाद होईल. पण, तुम्ही अनावश्यक वाद वाढवू नका. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा असेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. नवीन नोकरीची ऑफर देखील येईल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. जे व्यवसाय करत आहेत, त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील. तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. आज तुमच्या प्रेम जीवनात आनंद असेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.  

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे . गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरातील वादविवाद आज संपुष्टात येईल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. वरिष्ठ सदस्यांकडून काही कामे तुमच्यावर सोपवली जातील, जी तुम्ही निश्चितपणे पूर्ण करणं गरजेचं आहे. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक राहील. आज अनावश्यक पैसे खर्च करू नका. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर भविष्यात तुम्हालाच त्याचा फायदा होईल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. उच्च अधिकाऱ्यांशी बोलण्यात गोडवा ठेवा. मुलाचे आरोग्य सुधारेल. तुम्ही व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्यासाठी काढाल, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला आज परत मिळतील. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा, ज्यामुळे मनाला शांती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 02 June 2023 : वृषभ, कन्या, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget