एक्स्प्लोर

Go First Flights Cancelled: गो फर्स्टच्या प्रवाशांनी लक्ष द्या! आता 'या' तारखेपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द

Go First Flights Cancelled: गो फर्स्टबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एअरलाइन्सची उड्डाणं आता 7 जूनपर्यंत रद्द राहतील, असं सांगितलं आहे.

Go First Flights Cancelled: देशात स्वस्त विमानसेवा पुरवणाऱ्या GoFirst एअरलाइन्सनं स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केल्यानं भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये 3 मे रोजी स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केल्यानंतर कंपनीनं आपली सर्व उड्डाणं रद्द केली होती. आता या विमान कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अडचणीत असलेल्या GoFirst नं 7 जून 2023 पर्यंत सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. यापूर्वी कंपनीनं 4 जूनपर्यंत उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, आता कंपनीनं तारीख आणखी पुढे ढकलत उड्डाणं 7 जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  

गो फर्स्टची ट्वीट करून माहिती 

गो फर्स्टनं शुक्रवारी आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देताना खंत व्यक्त केली आहे. कंपनीनं सांगितलं की, ऑपरेशनल कारणांमुळे कंपनीनं आपली उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. यासोबतच रिफंडची माहिती देताना कंपनीनं सांगितलं की, एअरलाइन्स लवकरच सर्व प्रवाशांना त्यांचे पैसे रिफंड करणार आहे. यासोबतच कंपनीनं असंही म्हटलं आहे की, लवकरच आपल्या फ्लाइट्स बुक करण्याची प्रक्रियाही कंपनी सुरू करणार आहे.

डीजीसीएसमोर सहा महिन्यांचा आराखडा 

फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, GoFirst नं 2 जून रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडे 6 महिन्यांचा रिवायवल प्लान सादर केला आहे. इंटरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल (IRP) नं ही योजना DGCA ला सादर केली आहे. अहवालानुसार, एअरलाइन लवकरच 26 विमानांसह आपलं ऑपरेशन सुरू करण्याचा विचार करत आहे.

GoFirst चे आर्थिक संकट कसं सुरू झालं?

देशात स्वस्त विमानसेवा पुरवण्यासाठी GoFirst कंपनी ओळखली जाते. गो फर्स्ट एअरनं देशात स्वस्त हवाई सेवा सुरू ठेवली आहे. कंपनीनं स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी NCLT कडे 3 मे रोजी अर्ज केला होता. यासोबतच विमान कंपन्यांनी प्रॅट अँड व्हिटनी या अमेरिकन कंपनीवर आरोप केला होता की, विमानाच्या खराब इंजिनमुळे विमान कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना प्रॅट अँड व्हिटनी यांनी GoFirst चे सर्व आरोप निराधार असल्याचं सांगून गोफर्स्टला कर्ज न फेडण्याचा जुना इतिहास असल्याचं सांगितलं होतं. डीजीसीए आणि एनसीएलटी गो फर्स्टचं ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget