एक्स्प्लोर

ट्रेन क्रमांक 12841... 250 किमी धावल्यानंतर रुळावरून घसरली कोरोमंडल एक्सप्रेस, एका झटक्यात 233 जणांचा मृत्यू

Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात. अपघातात 233 जणांचा मृत्यू, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू

Odisha Train Accident: ओडिशाच्या (Odisha) बालासोर (Balasore) जिल्ह्यात शुक्रवारी तीन रेल्वे ट्रेन्सची एकमेकांना धडक झाली. येथे बहनागा स्टेशनजवळ SMVB-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. प्रथम हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडलला धडकली. या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस पश्चिम बंगालमधील कोलकातामधील हावडा स्टेशन आणि तामिळनाडूमधील चेन्नई दरम्यान धावते. अपघात झाला तेव्हा रेल्वेत असणाऱ्या प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. 

एका झटक्यात ट्रेन रुळावरून घसरली आणि गोंधळ झाला. ट्रेनचे डब्बे उलटल्यानं अनेक प्रवासी आत अडकले होते. त्यांची सुटका करण्यात अडचण येत आहे. दरम्यान, बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली असून सध्या बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. 

ट्रेन क्रमांक 12841 कोरोमंडल एक्सप्रेस शालीमार (पश्चिम बंगाल) रेल्वे स्थानकावरून चेन्नई सेंट्रलपर्यंत प्रवास करते. ही ट्रेन 25 तासांत 1659 किलोमीटर अंतर कापते. शुक्रवारी, कोरोमंडल एक्सप्रेसनं शालिमार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून 10 मिनिटं उशीर केला. काही मिनिटांनी ट्रेननं उशीर झालेला वेळ कव्हर केला. मात्र त्यानंतर साधारण 253 किमी अंतरावरील बहंगा बाजार स्थानकाजवळ काळानं घाला घातला आणि ट्रेनचा भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण 15 रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. यातील 7 डब्बे उलटले असून रेल्वे रुळ तुटल्यानं 4 डब्बे बाहेर आले आहेत. या अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला. 

अपघाताबाबात रेल्वे प्रशासनाचं निवेदन

रेल्वेनं एका निवेदनात म्हटलं आहे की, ट्रेन क्रमांक 12841 चेन्नई सेंट्रलहून शालीमारला जात होती. 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ही गाडी शालिमारकडे रवाना झाली होती. खरगपूर विभागांतर्गत बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रात्री 8.30 वाजता रेल्वे रुळावरुन घसरली. अप आणि डाऊन दोन्ही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी 

  • हावडा : 033 - 26382217 
  • खडगपूर : 8972073925, 9332392339 
  • बालासोर : 8249591559, 7978418322 
  • शालीमार (कोलकाता) : 9903370746 
  • रेलमदद : 044- 2535 4771

अपघात नेमका झाला कसा?

बहनागा स्टेशनजवळ SMVB-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. प्रथम हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडलला धडकली. 

हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र काही क्षणांतच या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी मालगाडी धडकली, आणि मग मृत्यूचं तांडवच सुरू झालं. यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनच्या चालकाला जवळच घडलेल्या अपघाताबाबत माहित नसावं. म्हणून त्याची ट्रेन पूर्ण वेगात होती. आणि हीच ट्रेन घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

हावडा एक्प्रेस आधी मालगाडीला धडकली; त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसवर मालगाडी आदळली... ओडिशा रेल्वे अपघाताची संपूर्ण कहाणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Embed widget