एक्स्प्लोर

हावडा एक्प्रेस आधी मालगाडीला धडकली; त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसवर मालगाडी आदळली... ओडिशा रेल्वे अपघाताची संपूर्ण कहाणी

Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये दोन मेल ट्रेन्सचा भीषण अपघात झालाय भीषण अपघातात 233 प्रवाशांचा मृत्यू, 900 जण जखमी

Odisha Train Accident: ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasore) येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम संयुक्तपणे बचावकार्य करत आहे. 

शुक्रवारी (2 मे) सायंकाळी हा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली. मात्र, आता ओदिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी या अपघाताबाबत मोठी माहिती दिली आहे. या अपघातात एकूण 3 गाड्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोमंडल एक्सप्रेसच्या 7 बोगींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणथी वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या प्रशासनाच्या सूचना

राज्याच्या मुख्य सचिवांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितलं की, आधी हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांवर आदळली आणि नंतर कोरोमंडल एक्स्प्रेस मागून आली, त्यामुळे भीषण अपघात झाला. आतापर्यंत 10 प्रवाशांना बालासोर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.

दुसरीकडे, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं की, लोकांना नेण्यासाठी सुमारे 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे. 

अपघाताबाबात रेल्वे प्रशासनाचं निवेदन

रेल्वेनं एका निवेदनात म्हटलं आहे की, ट्रेन क्रमांक 12841 चेन्नई सेंट्रलहून शालीमारला जात होती. 2 जून रोजी दुपारी 3.30 वाजता ही गाडी शालिमारकडे रवाना झाली होती. खरगपूर विभागांतर्गत बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रात्री 8.30 वाजता रेल्वे रुळावरुन घसरली. अप आणि डाऊन दोन्ही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी 

  • हावडा : 033 - 26382217 
  • खडगपूर : 8972073925, 9332392339 
  • बालासोर : 8249591559, 7978418322 
  • शालीमार (कोलकाता) : 9903370746 
  • रेलमदद : 044- 2535 4771

अपघात नेमका झाला कसा?

बहनागा स्टेशनजवळ SMVB-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. प्रथम हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडलला धडकली. 

हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र काही क्षणांतच या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी मालगाडी धडकली, आणि मग मृत्यूचं तांडवच सुरू झालं. यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनच्या चालकाला जवळच घडलेल्या अपघाताबाबत माहित नसावं. म्हणून त्याची ट्रेन पूर्ण वेगात होती. आणि हीच ट्रेन घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली. 

बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू 

शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. NDRFच्या चार तुकड्या, 30 डॉक्टर, 200 पोलीस कर्मचारी आणि 60 रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. ओडिशा सरकारचे अनेक मंत्री देखील काल रात्रीच अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर गंभीर जखमींना 2 लाखांचं सहाय्य केलं जाणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget