Odisha Railway Accident : ओदिशा रेल्वे अपघातानंतर काही गाड्या मार्ग बदलले तर काही गाड्या रद्द, पाहा यादी
Odisha Train Accident : ओदिशामधील रेल्वे अपघातानंतर या मार्गावरील काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या गाड्यांची यादी जारी करण्यात आली आहे.
Odisha Train Accident : ओदिशातील बालासोर इथे काल (2 जून) रात्री झालेल्या एका मोठ्या रेल्वे अपघातात 207 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, अपघातानंतर या मार्गावरील काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या गाड्यांची यादी जारी करण्यात आली आहे.
वळवलेल्या गाड्यांची यादी
ट्रेन क्रमांक - 22807 जी टाटा जमशेदपूर मार्गे जाईल.
ट्रेन क्रमांक- 22873 देखील टाटा जमशेदपूर मार्गे जाईल.
ट्रेन क्रमांक- 18409 देखील टाटा जमशेदपूरच्या दिशेने वळवण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक- 22817 टाटा जमशेदपूरच्या दिशेने वळवण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 15929 ही गाडी भद्रकला परत बोलावण्यात आली आहे.
12840 चेन्नई सेंट्रल - हावडा सध्या खरगपूर विभागातील जरोली मार्गे धावेल.
18048 वास्को द गामा - शालीमार कटक, साळगाव, अंगुल मार्गे वळवली जाईल.
22850 सिकंदराबाद-शालीमार साप्ताहिक ट्रेन कटक, साळगाव, अंगुल मार्गे वळवल्या जातील.
रद्द केलेल्या गाड्यांची यादी
ट्रेन क्रमांक 12837 हावडा पुरी सुपर फास्ट एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 12863 हावडा-एसएमव्ही बंगळुरु एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय, ट्रेन क्रमांक 12839 हावडा-चेन्नई सेंट्रल मेल, गाडी क्रमांक 12895, 20831 आणि 02837 देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
कसा झाला अपघात?
पहिल्यांदा सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे दोन डबे खरगपूरपासून सुमारे 140 किमी अंतरावर असलेल्या बहनगा बाजार स्थानकाजवळ संध्याकाळी 7.10 वाजता रुळावरुन घसरले. त्याचवेळी, चेन्नईकडे जाणारी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (12841) विरुद्ध दिशेने समांतर ट्रॅकवर भरधाव वेगाने येत होती. या धडकेत कोरोमंडल एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले. रुळावरून घसरलेले रेल्वेचे काही डबे समांतर ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. त्यामुळे अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
मृतांचा आकडा वाढला, 233 जणांचा मृत्यू
राज्याचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी हा अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत 233 जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रदीप जेना यांनी एएनआयला दिली.
Death toll rises to 233 in the horrific train accident in Odisha's Balasore: Odisha Chief Secretary Pradeep Jena pic.twitter.com/wvTKFA9c2R
— ANI (@ANI) June 3, 2023
संबंधित बातमी
Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी