एक्स्प्लोर

टाटा समूह गुजरातमध्ये 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, लिथियम आयन सेल प्रकल्प उभारणार

Lithium-Ion Cell Unit In Gujarat : टाटा समूह गुजरातमध्ये 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. टाटा समूहाने गुजरात सरकारसोबत एक सामंजस्य करारकेला आहे, ज्याअंतर्गत टाटा समूह राज्यात लिथियम आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग गिगा कारखाना उभारणार आहे.

Lithium-Ion Cell Unit In Gujarat : टाटा समूह (Tata Group) गुजरातमध्ये 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. टाटा समूहाने गुजरात (Gujarat) सरकारसोबत एक सामंजस्य करार (MoU) केला आहे, ज्याअंतर्गत टाटा समूह राज्यात लिथियम आयन सेल (Lithium-Ion Cell) मॅन्युफॅक्चरिंग गिगा कारखाना उभारणार आहे. टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या अग्रतास एनर्जी स्टोअरेज सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने (Agratas Energy Storage Solutions Pvt Ltd) गुजरात सरकारसोबत हा करार केला आहे.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी

प्रस्तावित गीगा कारखाना हा भारतातील पहिला लिथियम-आयन सेल उत्पादन कारखाना असेल. पहिल्या टप्प्यात 20 GWh च्या उत्पादन क्षमता आणि सुमारे 13,000 कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह कंपनी इथे निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. या सामंजस्य करारावर अग्रतास एनर्जी स्टोअरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ विजय नेहरा आणि गुजरात सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली आणि देवाणघेवाण केली.

रोजगाराच्या संधी उपलब्ध

टाटा समूहाने हा प्रकल्प इथे सुरु केल्याने गुजरात हे लिथियम-आयन सेल उत्पादनात आघाडीचे राज्य म्हणून स्थापित होईल आणि राज्यातील बॅटरी उत्पादनाच्या विकासाला हातभार लावेल. या गीगा कारखान्याच्या स्थापनेने 2030 पर्यंत देशात 50% कार्बन उत्सर्जन मुक्त ऊर्जा आणि 100% इलेक्ट्रिक वाहन वापराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुजरातला एक नवीन दिशा दिली आहे.

दरम्यान हा प्रकल्प इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि 13,000 हून अधिक व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असं म्हटलं जात आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

देशातील लिथियम-आयन बॅटरीची वाढती मागणी पूर्ण करणं हा या निर्मिती प्रकल्पाचा उद्देश आहे. सरकारकडून देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर जोर दिला जात असतानाच या प्रकल्पाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणाात रोजगार उपलब्ध होती, अशी आशा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी व्यक्त केली आहे. सोबतच या प्रकल्पामुळे राज्यात लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी एक इकोसिस्टम निर्माण करण्यात मदत होईल, असंही त्यांनी म्हटलं.

त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "गुजरातमध्ये देशातील पहिला लिथियम-आयन सेल उत्पादन करणारा गिगा कारखाना सुरु करण्यासाठी राज्य सरकार आणि टाटा समूह यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. राज्याच्या नवीन इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे फलित असलेल्या या सामंजस्य करारांतर्गत पहिल्या टप्प्यात 13 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 20 GW क्षमतेचा प्लांट उभारला जाईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.

इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीकोनासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने लिथियम-आयन बॅटरीची मागणीही वाढेल. या प्रकल्पामुळे राज्यात लिथियम-आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम स्थापना होण्यास मदत होईल."

हेही वाचा

New Jobs In Phone Manufacturing : केंद्र सरकारच्या पीएलआय योजनांमुळे स्मार्टफोन निर्मितीमधून दीड लाखांवर नोकऱ्यांची अपेक्षा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सर्वात स्वस्त सोने मिळणारे जगातील 10 देश कोणते? या यादीत भारताचा क्रमांक लागतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती
सर्वात स्वस्त सोने मिळणारे जगातील 10 देश कोणते? या यादीत भारताचा क्रमांक लागतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती
पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका! दरात वाढ होऊनही बुलढाण्यात इंधन विक्रीत 20 ते 25 टक्क्यांची वाढ 
पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका! दरात वाढ होऊनही बुलढाण्यात इंधन विक्रीत 20 ते 25 टक्क्यांची वाढ 
Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ; तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे भाव
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ; तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे भाव
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Embed widget