एक्स्प्लोर

Morning Headlines 28th May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

1. New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन, पाहा ऐतिहासिक सोहळ्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनानंतर आज आणखी एक ऐतिहासिक क्षण संपूर्ण देश याचि देहा याची डोळा पाहणार आहे. आज देशाला लोकशाहीचं नवं मंदिर मिळालं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन पार पडलं. मात्र त्यापूर्वी मोदींच्या हस्ते संसद भवनाबाहेर होमहवन आणि विधिवत पूजा करण्यात आली. पुजेला लोकसभा अध्यक्ष ओमबिर्लादेखील बसले होते. यावेळी राजदंडाची देखील पूजा करण्यात आली. पूजा केल्यानंतर राजदंडाची लोकसभेची स्थापना करण्यात आली. वाचा सविस्तर 

2. New Parliament Building Inauguration : नव्या संसद भवनाचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींचा राजदंडाला दंडवत, नव्या संसदेत राजदंड स्थापित

New Parliament Building Inauguration : देशाला आज नवीन संसद भवन (New Parliament Building) मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल (Sengol) म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेने झाली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते. वाचा सविस्तर 

3. New Parliament Building: आज देशाला मिळालं नवं संसद भवन, संसदेतील फर्नीचर महाराष्ट्रातील सागवानानं सजलं; जाणून घ्या नव्या इमारतीतील इतरही वैशिष्ट्ये

New Parliament Building: नव्या संसदेचं उद्घाटन (New Parliament Building Inauguration) अवघ्या काही तासांवर आलं आहे. पण देशाच्या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर बहिष्काराच्या बातम्या आहेतच, असं असलं तरी नव्या संसदेवरुन आणखी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु आहेत. नव्या संसदेच्या वैशिष्ट्यांवरुनही चर्चा रंगल्या आहेत. जुन्या संसदेपेक्षा जास्त खासदार बसू शकतील अशा भविष्याच्या हेतूनेच ही नवी संसद तयार करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

4. Wrestler Protest: कुस्तीपटूंकडून आज मोठ्या आंदोलनाची हाक; नव्या संसदेबाहेर महिला पंचायत भरवण्याची शक्यता, शेतकरी नेत्यांचीही उपस्थिती

Wrestlers' Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आज (28 मे) नव्या संसद भवनाच्या इमारतीचं (New Parliament House)  उद्घाटन करणार आहे. दरम्यान, जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांच्या समर्थनार्थ आज नव्या संसद भवनाबाहेर खाप पंचायत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

5. ABP C Voter Survey: भ्रष्टाचाराच्या आरोपात कर्नाटकात भाजपचा पराभव; पंतप्रधान मोदी 'करप्शन फ्री इमेज' राखू शकतील? जनतेचं म्हणणं काय?

ABP C Voter Survey: कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election 2023) काँग्रेसनं (Congress) भाजपवर (BJP) '40 टक्के कमीशन सरकार' म्हणत भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations of Corruption) करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. त्यामुळे कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसला दणदणीत विजय मिळाल्याचं बोललं जात आहे. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना राष्ट्रीय स्तरावर आव्हान देणं काँग्रेससाठी कठीणच आहे. याबाबत 'एबीपी माझा' असा दावा करत नसून, एका सर्वेक्षणातूनच ही बाब समोर आली आहे. वाचा सविस्तर

6. 2000 Rs Note: 'त्या' दोन हजारांच्या नोटा आरबीआय जाळणार की त्याचं काय करणार? जाणून घ्या सविस्तर

2000 Rs Note:  दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा केल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे जमा होणार आहे. पण सगळ्यांच्या मनात याबाबत अनेक प्रश्न आहेत ते म्हणजे या दोन हजाराच्या नोटा परत घेतल्यानंतर त्या पूर्णपणे नष्ट केल्या जातील का? त्या फक्त रद्दी म्हणून राहतील का? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात. वाचा सविस्तर

7. IPL 2023 Final : चेन्नई आणि गुजरात यांच्यात महामुकाबला; कोण ठरणार चॅम्पियन? वाचा कुठे आणि कधी होणार सामना

GT vs CSK, IPL 2023 Final : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम फेरीचा थरार आज पाहायला मिळणार आहे. 31 मार्च रोजी सुरु झालेल्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील आज अंतिम सामना रंगणार असून आज यंदाच्या मोसमाचा विजेता ठरणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोंदी स्टेडिअमवर 28 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता महामुकाबला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली. आता अंतिम सामन्यात गुजरात टायटन्ससमोर महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असेल. वाचा सविस्तर 

8. 28th May In History: स्वातंत्र्यवीर सावरकर, उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म; आज इतिहासात...

28th May In History: प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी या दिवसात घडलेल्या असतात. आजच्या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा नाशिकमध्ये  जन्म झाला. तर, देशातील नावाजलेले उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्मदेखील आजच्या दिवशी झाला. वाचा सविस्तर 

9. Horoscope Today 28 May 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 28 May 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना जास्त काम करण्याची संधी मिळेल. तर, वृषभ राशीच्या लोकांना उच्च अधिकार्‍यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. धनु राशीच्या लोकांना मित्राच्या मदतीने चांगली नोकरी मिळू शकते. मेष ते मीन राशींसाठी आजचा रविवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य, वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णीदुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तरSanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget