(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Pitru Paksha 2024 Impact on Zodiac Signs : पितृ पक्षात 5 राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात तुम्हाला पैशाच्या बाबतीत जपून राहावं लागेल, नोकरी-व्यवसायात देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Pitru Paksha 2024 Zodiac Signs : पंचांगानुसार, पितृ पक्ष मंगळवारी, 17 सप्टेंबरला सुरू झाला आहे. पितृ पक्षाची समाप्ती 2 ऑक्टोबरला होणार आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध वैगरे केले जातात. पितृ पक्षात ग्रहण लागल्यामुळे आणि ग्रहांच्या चालीतील बदलामुळे काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.
यंदा पितृ पक्षाच्या काळात 2 ग्रहण लागले आहेत. मीन राशीत चंद्रग्रहण झाल्यामुळे पितृ पक्षात काही राशींवर याचा वाईट परिणाम होईल. याशिवाय कन्या राशीत सूर्य आणि केतूची युती होत आहे. या दोन कारणांमुळे 5 राशींना करिअरसोबतच आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो. पितृ पक्षात कोणत्या राशींना झेलावे लागणार कष्ट? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
पितृ पक्ष तुमच्यासाठी कठीण जाईल, या काळात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. काही दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेले असले तरी तुमच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग शोधले पाहिजे. तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल खूप दिवसांपासून काळजी वाटत असेल, तर आता तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार केला पाहिजे. या काळात तुम्हाला अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं, नाहीतर तुमचे प्रगतीचे मार्ग खुंटतील. पितृ पक्षाच्या काळात तुम्हाला नोकरीत अडचणी येऊ शकतात. खर्च वाढल्याने जबाबदाऱ्याही वाढणार आहेत. तुम्ही कितीही केलं तरी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवता येणार नाही. नोकरी बदलण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवणं चांगलं. पुढील काही दिवस तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा आर्थिक तंगीमुळे तुमची डोकेदुखी वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे वाद होतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अपमानाला सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या बदलत्या वर्तनामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमच्या नोकरीमुळे त्रस्त असाल तर ती बदलणं हा योग्य निर्णय असेल.
वृश्चिक रास (Scorpio)
2 ऑक्टोबरपर्यंतचा काळ कठीण असेल, या काळात तुमचे अनेकांशी खटके उडू शकतात. त्यामुळे काही काळ वादांपासून दूर राहणं चांगलं. कृपया काहीही बोलण्यापूर्वी विचार करा. तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावतील. नोकरीत कर्मचाऱ्यांशी वादही होऊ शकतात, अशा परिस्थितीत तुम्ही नोकरी सोडण्याचा निर्णयही घेऊ शकता.
मीन रास (Pisces)
मीन राशीवर संकटांचं डोंगर कोसळू शकतं, त्यामुळे या राशीच्या लोकांनी काहीही करण्यापूर्वी नीट विचार करणं गरजेचं आहे. तुमचं एक पाऊल तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं. आर्थिक अडचणी आल्यास कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. जर तुम्ही तुमची नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही याचा नक्कीच विचार करू शकता. व्यवसायात तुम्हाला अडचणी येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :