2000 Rs Note: 'त्या' दोन हजारांच्या नोटा आरबीआय जाळणार की त्याचं काय करणार? जाणून घ्या सविस्तर
2000 Rs Note: चलनातून बाद केलेल्या नोटांचे आरबीआय नेमकं करतं तरी काय?
2000 Rs Note: दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा केल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे जमा होणार आहे. पण सगळ्यांच्या मनात याबाबत अनेक प्रश्न आहेत ते म्हणजे या दोन हजाराच्या नोटा परत घेतल्यानंतर त्या पूर्णपणे नष्ट केल्या जातील का? त्या फक्त रद्दी म्हणून राहतील का? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.
दोन हजाराची नोट चलनातून परत घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केला आहे. चलनातील या दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत सर्व सामान्य नागरिकांना कुठल्याही बँकेत जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. भारतातल्या सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत जेवढ्याही दोन हजाराच्या नोटा जमा होतील त्या सर्व 2000 च्या नोटा आरबीआयकडे परत पाठवल्या जाणार आहेत.
जमा केलेल्या नोटांचा सर्वप्रथम काय होतं?
सर्व बँकांमध्ये गोळा केलेल्या नोटा आरबीआयकडे जमा होतात. त्यानंतर या सर्व नोटा चलन पडताळणी आणि प्रक्रिया प्रणाली (CVPS) मध्ये टाकल्या जातील. हे सीव्हीपीएस मशीन एका तासामध्ये 50 हजार ते 60 हजार नोटांवर प्रक्रिया करु शकते. हे मशीन नोटांची मोजणी करतं आणि या मशीनद्वारे नोटाही तपासल्या जातात. त्यानंतर नोटा खऱ्या आहेत की खोटा, म्हणजे त्यांची फिट आणि अनफिट कॅटेगिरीच्या श्रेणीमध्ये विभागणी होते. ज्या नोटा खोट्या किंवा अनफिट असतात त्या कापल्या जातात, त्यांचे तुकडे तुकडे केले जातात. पण ज्या नोटा योग्य किंवा फीट आहेत त्या सर्व नोटा अशा पद्धतीने कापल्या जातात की, त्या पुन्हा नव्यानं तयार होणाऱ्या चलनी नोटांमध्ये त्या पुन: वापरल्या जातात किंवा त्या रिसायकल होऊ शकतात
नोटा जाळल्या जातात ?
याआधी जेव्हा असा निर्णय घेण्यात आला होता, त्यावेळी जमा झालेल्या नोटा या जाळल्या जायच्या, परंतू यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याचं लक्षात आलं, अनफिट नोटा ब्रिकेटिंग सिस्टम मध्ये पाठवल्या जातात, जिथे त्यावर प्रक्रिया करुन ब्रिकेट बनवले जातात, हे ब्रिकेट औद्योगिक भट्ट्यांमध्ये वापरले जाऊ शकतात, त्याचवेळी ते पेपर बोर्ड तयार करण्यासाठीदेखील वापरले जाऊ शकतात.
या ब्रिकेट करण्यासाठी आरबीआयकडून टेंडर मागवलं जातं. ज्यावेळी 2016 मध्ये नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाहेर आल्या होत्या, तेव्हा तुटलेल्या किंवा कापलेल्या नोटा वेस्टर्न इंडिया प्लायवूड्स लिमिटेडला विकल्या गेल्या होत्या. यावेळीही अशीच प्रक्रिया अवलंबली जाऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटा बद्दल काय होईल याचा हा अंदाज आहे. पण इतरही ज्या जळालेल्या, कापलेल्या, फाटलेल्या नोटा तुम्ही बँकेत जमा करुन त्या बदल्यात चांगल्या नोटा दिल्या जातात. आरबीआय सगळ्या खराब नोटा जमा करुन सीव्हीपीसमध्ये पाठवते आणि त्या सगळ्या खराब नोटांसाठी वरती जी प्रणाली सांगितली आहे, त्याच प्रणालीचा वापर केला जातो. आरबीआयच्या 2021-22 की वार्षिक अहवालानुसार या वर्षी 1878.01 कोटी खराब नोटा नष्ट करण्यात आल्या होत्या, ज्या 2020-21 की तुलनेपेक्षा 88.4 टक्के जास्त होत्या.