New Parliament Inauguration LIVE Updates: आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन, विरोधकांचा मात्र उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार; जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
New Parliament Building Inauguration Live: आज देशाला नवी संसद मिळणार आहे. नव्या संसदेचा उद्घाटन सोहळा लवकरच सुरू होणार आहे. येथे मिळवा क्षणोक्षणीचे अपडेट्स...
LIVE
Background
New Parliament Building Inauguration Live: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनानंतर आज आणखी एक ऐतिहासिक क्षण संपूर्ण देश याचि देहा याची डोळा पाहणार आहे. आज देशाला लोकशाहीचं नवं मंदिर मिळणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणाराय. आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशासह जगाचं लक्ष लागलंय. सेन्ट्रल व्हिस्टा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि याच सेन्ट्रल व्हिस्टामध्ये संसद भवन आहे. अगदी कोरोना काळातही सेंट्रल व्हिस्टाचं काम सुरू होतं. अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं आज उद्घाटन होतंय. या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपकडून वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
नव्या संसदेचं उद्घाटन (New Parliament Building Inauguration) अवघ्या काही तासांवर आलं आहे. पण देशाच्या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर बहिष्काराच्या बातम्या आहेतच, असं असलं तरी नव्या संसदेवरुन आणखी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु आहेत. नव्या संसदेच्या वैशिष्ट्यांवरुनही चर्चा रंगल्या आहेत. जुन्या संसदेपेक्षा जास्त खासदार बसू शकतील अशा भविष्याच्या हेतूनेच ही नवी संसद तयार करण्यात आली आहे.
संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं आणि त्यात एका गोष्टीचीही जोरदार चर्चा आहे नव्या संसदेत वाढलेल्या जागांची. जुन्या संसदेत लोकसभेत 543 खासदार बसू शकत होते, तर नव्या संसदेत 888 खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तर राज्यसभेत सध्याची 250ची क्षमता वाढवून 384 करण्यात आली आहे. नवी इमारत बांधताना साहजिकच भविष्यातल्या गरजांचा विचार करुनच ती बांधण्यात आली आहे. त्यामुळे त्यात खासदारांची भविष्यात वाढू शकणारी संख्याही गृहीत धरली आहे. अशीच नव्या संसद भवनाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जाणून घेऊया नव्या संसद भवनाबाबतच्या काही खास गोष्टी सविस्तर...
नवीन संसद भवन कुणी बांधलं?
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला नव्या संसद भवनाची इमारत बांधण्याचं कंत्राट मिळालं होतं. त्यांनी सप्टेंबर 2020 मध्ये 861.90 कोटी रुपयांची बोली लावून हा करार जिंकला होता. नवं संसद भवन सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पाची ब्लू प्रिंट गुजरातमधील एचसीपी डिझाईन या आर्किटेक्चर फर्मनं तयार केली आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागानं (CPWD) गेल्या संसद, कॉमन सेंट्रल सेक्रेटरियट आणि सेंट्रल व्हिस्टाच्या विकासासाठी सल्लागार म्हणून एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटला ऑक्टोबर 2019 मध्ये नेमलं होतं.
सेंट्रल व्हिस्टा क्षेत्राचा मास्टर प्लॅन आणि नवीन गरजांनुसार इमारतींचे डिझाईन तयार करण्यात या कंपनीचा सहभाग आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची निविदा सीपीडब्ल्यूडीनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काढली होती. सल्लागारांसाठी 229.75 कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला होता. एचसीपी डिझाइननं ही बोली जिंकली. एचसीपी डिझाईनला गुजरातमधील गांधीनगरमधील सेंट्रल व्हिस्टा आणि राज्य सचिवालय, अहमदाबादमधील साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, मुंबई पोर्ट कॉम्प्लेक्स, वाराणसीमधील मंदिर कॉम्प्लेक्सचा पुनर्विकास, आयआयएम अहमदाबादच्या न्यू कॅम्पस डेव्हलपमेंटसारख्या प्रकल्पांचा पूर्वीचा अनुभव आहे.
New Parliament Inauguration : सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या लोकसभेचे उद्घाटन केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष आणि इतर मंत्र्यांनी सेंट्रल हॉलमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली.
New Parliament Inauguration : नवीन संसदे भवनात चाणक्य आणि अखंड भारताचे फोटो
भारताच्या नवीन संसद भवनात चाणक्य आणि अखंड भारताचे फोटो लावण्यात आले आहे.
New Parliament Building : आज देशाला मिळालं नवीन संसद भवन
New Parliament Building : नव्या संसदेचं उद्घाटन (New Parliament Building Inauguration) संपन्न आलं आहे. पण देशाच्या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर बहिष्काराच्या बातम्या आहेतच, असं असलं तरी नव्या संसदेवरुन आणखी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु आहेत. नव्या संसदेच्या वैशिष्ट्यांवरुनही चर्चा रंगल्या आहेत. जुन्या संसदेपेक्षा जास्त खासदार बसू शकतील अशा भविष्याच्या हेतूनेच ही नवी संसद तयार करण्यात आली आहे.
New Parliament Inauguration : सेंट्रल हॉलमध्ये भाजप खासदार वीर सावरकरांना आदरांजली वाहणार
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, थोड्याच वेळात भाजपचे खासदार जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जमून वीर सावरकरांना आदरांजली वाहतील.
New Parliament Inauguration : पंतप्रधान मोदी 'सर्व-धर्म' प्रार्थना समारंभात सहभागी
नवीन संसद भवनात आयोजित 'सर्व-धर्म' प्रार्थना समारंभात पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि कॅबिनेट मंत्री सहभागी झाले.
Delhi | PM Modi along with Lok Sabha Speaker Om Birla and Cabinet ministers attends a 'Sarv-dharma' prayer ceremony being held at the new Parliament building pic.twitter.com/lfZZpTDMHx
— ANI (@ANI) May 28, 2023