एक्स्प्लोर

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह

Ratnagiri Crime News : सस्पेन्स, हॉरर-थ्रिलरपटासारखी एक घटना कोकणात समोर आली आहे. व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर पोलिसांनी FIR नोंदवला. त्यावर केलेल्या तपासात थेट कुजलेला मृतदेहच आढळून आला.

Ratnagiri Crime News  : एका मुलाच्या स्वप्नात मृत्यू झालेली व्यक्ती येते आणि मदतीचे आवाहन करते.  पाहिलेले स्वप्न हा तरुण पोलिसांना सांगतो. पोलीस ही त्याच्या जबावार एफआयआर नोंदवतात आणि तपास करतात. तपासात खरंच एक कुजलेला मृतदेह आढळून येतो आणि पोलिसही चक्रावून जातात. एखाद्या सस्पेन्स, हॉरर-थ्रिलरपटाची ही गोष्ट नसून आपल्या कोकणात घडलेली ही घटना आहे.  आता, पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू करत आहेत. मात्र, समोर आलेल्या या घटनेची एकच चर्चा सुरू झाली असून विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत. 

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्न पडले, त्याने ते खेड पोलिसाना सांगितले. त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलले आहे. 

स्वप्नात येऊन मदतीची याचना...

अशाच प्रकारची एक नोंद पोलिसांच्या एफआयआर मध्ये सुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांच्या एफआयआर नुसार, 17 सप्टेंबर 2024 रोजी योगेश पिंपळ आर्या (30) ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी  येथील आजगांव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलीस स्थानकात दाखल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे.’

योगेश आर्या च्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी केली. त्यावेळी भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्टया बांधून त्याला टॉवेलने बांधून गळफास असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट आणि या पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. तर मृतदेहापासून 5 फुटावर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ एआयआर कंपनीचे काळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅकमधे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांना करावा लागणार आहे. 

पोलिसांना करावी लागणार अनेक प्रश्नांची उकल...

मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा असे स्पष्ट होते.  मात्र, या मृतदेहाबाबत स्थानिकांना काहीच कळले नाही. मात्र, थेट मृतदेहच सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची बातमी स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलीस मृतदेह शोधतात या गोष्टीवरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही बाब ही गोष्ट विचार करायला लावणारी, अचंबित करणारी आणि तितकीच खळबळजनक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणाचे गूढ पोलिसांना उलगडावे लागणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगाSpecial Report | Waghya Dog Statue Issue | 'वाघ्या'चं कारण, जातीवरुन राजकारणSpecial Report | Disha Salian | आरोपांना ड्रग्जची 'दिशा', आदित्य ठाकरेंविरोधात स्फोटक आरोपRajkya Shole | Prashant Koratkar | कोरटकरचा आका कोण?महिनाभर पोलिसांना गुंगारा,कोरटकरला आसरा  कुणाचा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Sanjay Raut Kunal Kamra :  कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Embed widget