एक्स्प्लोर

IPL 2023 Final : चेन्नई आणि गुजरात यांच्यात महामुकाबला; कोण ठरणार चॅम्पियन? वाचा कुठे आणि कधी होणार सामना

CSK vs GT : आज आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्याचा थरार गुजरात आणि चेन्नई यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.

GT vs CSK, IPL 2023 Final : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम फेरीचा थरार आज पाहायला मिळणार आहे. 31 मार्च रोजी सुरु झालेल्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील आज अंतिम सामना रंगणार असून आज यंदाच्या मोसमाचा विजेता ठरणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोंदी स्टेडिअमवर 28 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता महामुकाबला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली. आता अंतिम सामन्यात गुजरात टायटन्ससमोर महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असेल. 

चेन्नई आणि गुजरात यांच्यात महामुकाबला

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सने थेट अंतिम फेरी गाठली. एलिमिनेटर सामन्यात त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 मध्ये पोहोचला. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आता अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने असतील.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सामना

गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघ आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीचा रणसंग्राम आज, 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.

Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

गुजरात की चेन्नई कोण मारणार बाजी? 2008 पासून कोणत्या संघाने चषक उंचावला, वाचा एका क्लिकवर

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget