New Parliament Building Inauguration : पंतप्रधान मोदींचा राजदंडाला दंडवत, नव्या संसदेत राजदंड स्थापित
New Parliament Building Inauguration : देशाला आज नवीन संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द केला.
New Parliament Building Inauguration : देशाला आज नवीन संसद भवन (New Parliament Building) मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल (Sengol) म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेने झाली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते.
पंतप्रधान मोदींकडून मजुरांचा सत्कार
नवीन संसदेत राजदंड बसवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही इमारत बांधणाऱ्या मजुरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या मजुरांचा सत्कार केला.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नए संसद भवन के उद्घाटन के बाद भवन के निर्माण में काम करने वाले श्रमिकों को सम्मानित किया। pic.twitter.com/tN4rlOf6EV
— ANI_HindiNews (@AHindinews) May 28, 2023
नवीन इमारतीच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवनात महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली. सकाळी सव्वासातच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळ्यात आधी संसद भवन संकुलात असलेल्या गांधी मूर्तीजवळ बांधलेल्या विशेष मंडपामध्ये सकाळी साडेसात वाजता पूजा आणि हवनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर तामिळनाडूच्या पुरोहितांनी पंतप्रधान मोदींना राजदंड सुपूर्द केला, जो त्यांनी संसद भवनात स्थापित केला. लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या शेजारी हा राजदंड स्थापित करण्यात आला आहे.
#WATCH | PM Modi handed over the historic 'Sengol' by Adheenams before its installed in the new Parliament building pic.twitter.com/vGWhI9mg34
— ANI (@ANI) May 28, 2023
नव्या संसदेतल्या राजदंडाचं महत्त्व काय?
- सातव्या शतकात एका तामिळ संताने या राजदंडाची निर्मिती केल्याचं म्हटलं जातं
- अफाट साम्राज्यविस्तार करणाऱ्या चोल राजघराण्यात सत्तेचं हस्तांतरण या राजदंडाद्वारेच व्हायचं
- इंग्रजांकडून सत्ता सोडायचा क्षण आला तेव्हा हस्तांतर म्हणजे नेमकं काय करायचं असं लॉर्ड माऊंटबॅटन यांनी विचारलं, त्यावर नेहरुंनी सी राजगोपालचारी यांच्याशी सल्लामसलत केली.
- राजगोपालचारी यांनी तामिळनाडूतल्या चोल साम्राज्यातल्या या जुन्या परंपरेची माहिती दिली होती.
- त्यानुसार हा राजदंड 15 ऑगस्ट 1947 च्या सत्ता हस्तांतरणावेळी वापरला गेला होता
- पण नंतर तो प्रयागराजच्या संग्रहालयात ठेवला गेला होता. आता तो संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्जीशेजारी बसवण्यात आला आहे.
हेही वाचा