एक्स्प्लोर

Horoscope Today 28 May 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 28 May 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 28 May 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना जास्त काम करण्याची संधी मिळेल. तर, वृषभ राशीच्या लोकांना उच्च अधिकार्‍यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. धनु राशीच्या लोकांना मित्राच्या मदतीने चांगली नोकरी मिळू शकते. मेष ते मीन राशींसाठी आजचा रविवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करतायत त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरीत यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते ज्यामध्ये तुम्हाला उत्पन्नात अधिक वाढ दिसेल. कोणत्याही नवीन उपक्रमासाठी काळ चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाला राग येईल अशा पद्धतीने कोणाशीही बोलू नका. तुमची रखडलेली कामे पूर्ण करा. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. आज मुलांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज मीडिया आणि बँकिंग क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. बऱ्याच काळापासून तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज ते तुमच्यासाठी यशस्वी होईल. तब्येतीत चढ-उतार असतील. बाहेरचे अन्न खाणेही टाळावे लागेल. तुम्ही तुमच्या नोकरीत बदलासाठी विचार करू शकता. वरिष्ठ सदस्याचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकतात. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे कोणतेही रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्व लोकांची मनं जिंकू शकता. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी दिसतील.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केलेत जसे की, मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा समावेश केला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. मालमत्तेशी संबंधित वाद निर्माण होऊ शकतात. बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या कुटुंबा तेढ निर्माण होऊ शकते, काळजी घ्या. अविवाहित लोकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. आज धार्मिक कार्यक्रमात कुटुंबियांसोबत थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. अधिकाऱ्यांकडून शुभवार्ता मिळतील. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायासाठी काळ अनुकूल आहे. व्यवसायाशी संबंधित सहलीवर जाण्याची शक्यता देखील आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर असेल. नवीन लोकांशी संपर्क होतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. नोकरीत बढतीच्या संधीही मिळतील. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. बँकिंग आणि मीडियाशी संबंधित लोकांना यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत यश मिळेल. वरिष्ठ आणि कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. पैसे कसे वाचवायचे ते तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून शिकायला मिळेल, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. कुटुंबातील सर्व सदस्य धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवतील, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. शिक्षणात यश मिळाल्याने आनंद होईल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमच्या संपर्कांमुळे तुम्ही व्यवसाय आणि व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. जे व्यवसाय करत होते, ते व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते वेळेवर परत करा. वरिष्ठांचे सहकार्य घेण्यात यश मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. नवीन वाहनाचा आनंद मिळण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसतील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत देखील मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. कौटुंबिक सदस्य एकत्र धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. आज व्यवसायात यश मिळेल. नवीन संपर्क देखील वाढतील. कोणत्याही नवीन उपक्रमासाठी काळ चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करा. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठीही वेळ उत्तम आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. राजकारणात यशासाठी काळ अनुकूल आहे. तुमचा कोणताही जुना वाद संपुष्टात येऊ शकतो. ज्यांना नोकरीची इच्छा आहे त्यांना चांगली संधी मिळेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. वरिष्ठांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. आज कोणालाही वाईट शब्द बोलू नका, नाहीतर अडचणीत अडकू शकता. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करत आहेत, त्यांना खूप फायदा होणार आहे. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळाल्यास पालकांना खूप आनंद होईल, त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटेल. शेजारी राहणाऱ्या वादात पडणे टाळा. दूरच्या नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. आज तुम्हाला मॅनेजमेंट आणि फायनान्सच्या नोकरीत यश मिळेल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील.  जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. मित्राच्या माध्यमातून तुम्हाला काही उत्पन्नाच्या संधीही मिळतील. तुम्हाला शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला सर्व क्षेत्रातून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस आनंददायी असेल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य आणि तुमचे मित्र एकत्र एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. घराची सजावट आणि दुरुस्तीवरही भरपूर पैसा खर्च होऊ शकतो. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही कोणतेही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यक्रमातही तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तुमच्या मनाची कोणतीही इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. व्यवसायात अडकलेला पैसा मिळेल. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना काही आकस्मिक लाभ मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तब्येतीत चढ-उताराची स्थिती आहे. बाहेरचे अन्न खाणे टाळावे. नोकरीत मोठा फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीसाठी ऑफर देखील येईल, परंतु तुमच्या जुन्या नोकरीवर टिकून राहणे चांगले होईल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. घर, फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज जुन्या मित्राबरोबर भेट होईल, जुन्या आठवणीही ताज्या होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 27 May 2023 : महिन्यातला शेवटचा शनिवार 'या' राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on BDD: मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
Nashik News : नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा, भूकंप की विमान दुर्घटना? मोठी माहिती समोर
नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा, भूकंप की विमान दुर्घटना? मोठी माहिती समोर
बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा आपल्याला मुंबईत आला पाहिजे याचं बीडीडी चाळ उत्तम उदाहरण : एकनाथ शिंदे
बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा आपल्याला मुंबईत आला पाहिजे याचं बीडीडी चाळ उत्तम उदाहरण : एकनाथ शिंदे
Kolhapur Circuit Bench: रस्त्यांपासून पॅचवर्कपर्यंत ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत; सर्किंट बेंचच्या लोकार्पणासाठी कोल्हापूरने कात टाकली!
रस्त्यांपासून पॅचवर्कपर्यंत ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत; सर्किंट बेंचच्या लोकार्पणासाठी कोल्हापूरने कात टाकली!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on BDD: मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
Nashik News : नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा, भूकंप की विमान दुर्घटना? मोठी माहिती समोर
नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा, भूकंप की विमान दुर्घटना? मोठी माहिती समोर
बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा आपल्याला मुंबईत आला पाहिजे याचं बीडीडी चाळ उत्तम उदाहरण : एकनाथ शिंदे
बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा आपल्याला मुंबईत आला पाहिजे याचं बीडीडी चाळ उत्तम उदाहरण : एकनाथ शिंदे
Kolhapur Circuit Bench: रस्त्यांपासून पॅचवर्कपर्यंत ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत; सर्किंट बेंचच्या लोकार्पणासाठी कोल्हापूरने कात टाकली!
रस्त्यांपासून पॅचवर्कपर्यंत ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत; सर्किंट बेंचच्या लोकार्पणासाठी कोल्हापूरने कात टाकली!
Jalgaon Crime : तरुणीसोबत कॅफेत गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू, मृतदेह त्याच्याच घरासमोर फेकला अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
तरुणीसोबत कॅफेत गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू, मृतदेह त्याच्याच घरासमोर फेकला अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
Gold Rate Today : सोने आणि चांदीच्या दरात तेजी, MCX वर दर वाढले, जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
सोने आणि चांदीच्या दरात तेजी, MCX वर दर वाढले, जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
Nanded Crime: पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला अन् स्पा सेंटरचा भांडाफोड झाला; दोन मुली अन् दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला अन् स्पा सेंटरचा भांडाफोड झाला; दोन मुली अन् दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?
गंगा जशी नाल्यांनी प्रदुषित झाली तसाच संघ सुद्धा प्रदुषित होण्याची शक्यता! भाजपच्या सरसकट आयाराम धोरणावर गोविंद गिरी महाराजांचा अप्रत्यक्ष टोला
गंगा जशी नाल्यांनी प्रदुषित झाली तसाच संघ सुद्धा प्रदुषित होण्याची शक्यता! भाजपच्या सरसकट आयाराम धोरणावर गोविंद गिरी महाराजांचा अप्रत्यक्ष टोला
Embed widget