एक्स्प्लोर

Morning Headlines 14th May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

1. Basavaraj Bommai Resigns: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा; रविवारी काँग्रेस आमदारांची बैठक

Basavaraj Bommai Resigns: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज रात्री, त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. तर, दुसरीकडे स्पष्ट बहुमत मिळवलेल्या काँग्रेस आमदारांची रविवारी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळाचा गट नेता ठरवण्यात येण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

2. Sunil Kanugolu: करेक्ट प्लानिंग अन् अचूक टायमिंग; काँग्रेसच्या कर्नाटक विजयचा रियल हिरो, कोण आहेत सुनील कानुगोलू?

Sunil Kanugolu: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Election 2023) निकाल समोर आले आहेत. कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसनं बाजी मारली असून भाजपचा (BJP) राज्यातून सफाया केला आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाची लाट असतानाच, त्यांच्यात या विजयाचं श्रेय वाटून घेण्यासाठी चढाओढही सुरू आहे. काँग्रेसच्या या विजयात अनेक वाटकेरी आहेत. ज्यांच्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा भारताच्या दक्षिणेकडील राज्यांत परतली आहे. काँग्रेसच्या विजयाच्या मानकऱ्यांबाबत बोलायचं झालं तर अनेक नावं समोर येतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यापासून ते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्यापर्यंत, काँग्रेसच्या विजय अनेक नावांमध्ये विभागला जाऊ शकतो, परंतु या सर्वांमध्ये एक नाव आणि चेहरा आहे, ज्याच्या बाजूनं सर्व एकमतानं उभे राहतील. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती बनवणाऱ्या आणि या निकालाची पटकथा लिहिणारं ते नाव म्हणजे सुनील कानुगोलू (Sunil Kanugolu). वाचा सविस्तर 

3. डीके शिवकुमार सव्वा लाखाने तर 'हा' उमेदवार फक्त 105 मतांनी विजयी; जाणून घ्या सर्वाधिक आणि कमी मार्जिनने जिंकणारे उमेदवार

Karnataka Election Result : नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत अनेक विक्रम झाले आहेत. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबिज केली आहे तर भाजप आणि जनता दलाच्या उमेदवारांचा सुफडा साफ झाल्याचं दिसून आलं. भाजपला अपेक्षेहून कमी जागा मिळाल्या आहेत. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम काँग्रेसच्या डीके शिवकुमार यांच्या नावावर आहे, तर सर्वात कमी मतांनी निवडून येण्याचा विक्रमही काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावावरच आहे. वाचा सविस्तर 

4. Sameer Wankhede : "देशभक्त असल्याची शिक्षा मिळतेय"; CBI छापेमारीनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वानखेडे यांच्यावर सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात इतर अनेक अधिकारी आणि खासगी लोकांचीही नावं आहेत. सीबीआयनं समीर वानखेडे यांच्या घरावर एक दिवस आधी छापा टाकला होता. आता यासंदर्भात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचं वक्तव्य समोर आलं आहे. देशभक्त असल्याची शिक्षा मिळत असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर

5. Parineeti Raghav Engagement : खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक; परिणीती आणि राघवचा रॉयल साखरपुडा

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. गेले काही दिवस मौन बाळगून एकत्र दिसणारे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो टाकून चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. वाचा सविस्तर 

6. Weather Today Updates : 'या' राज्यांमध्ये उष्णतेची लाट तर 'इथे' पावसाचा अंदाज; कसं असेल विविध राज्यांमध्ये हवामान?

Weather Today Updates : मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून (Heat) काहीसा दिलासा मिळाला. मात्र, गेल्या आठवड्यापासून उष्णतेने कहर केला आहे. हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने विक्रम मोडीत काढला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतांश भागात 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी (14 मे) राष्ट्रीय राजधानीसह बहुतांश राज्यांमध्ये हवामानाचे स्वरुप पुन्हा एकदा बदलू शकतं. वाचा सविस्तर 

7. Horoscope Today 14 May 2023 : आजचा रविवार 'या' राशीच्या लोकांसाठी आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 May 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. रविवारी मेष आणि वृषभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. त्याच वेळी, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी रविवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊतABP Majha Headlines :  10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
Embed widget