एक्स्प्लोर

Parineeti Raghav Engagement : खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक; परिणीती आणि राघवचा रॉयल साखरपुडा

Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. गेले काही दिवस मौन बाळगून एकत्र दिसणारे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो टाकून चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. 

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना आजवर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक दिवस एकमेकांना डेटिंग केल्यानंतर नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला. खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक आणि शाही भोजन हे परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचं विशेष आकर्षण होतं. 

राजकारणी ते सेलिब्रिटी; परिणीती-राघव यांच्या साखरपुड्याला दिग्गजांची उपस्थिती

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक राजकारणी मंडळी परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला उपस्थित होते. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आणि परिणीतीची बहिण प्रियांका चोप्रानेदेखील बहिणीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा पार पडला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @parineetichopra

परिणीती चोप्राने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री राघव चड्ढा यांच्यासोबत रोमॅंटिक अंदाजात दिसत आहे. साखरपुड्यासाठी परिणीती आणि राघव यांनी खास लूक केला होता. परिणीतीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि राघव यांनीदेखील पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. राघव यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं आहे,"मी प्रार्थना केली... अखेर ती हो म्हणाली". 

सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. प्रियांका चोप्राने लिहिलं आहे,"अभिनंदन तिशा आणि राघव… आता आम्ही लग्नाची वाट पाहतोय! तुम्हा दोघांसाठी आणि कुटुंबासाठी मी खूप आनंदी आहे. त्याबरोबरच सर्वांना पुन्हा भेटून फारच मज्जा आली". विनोदवीर कपिल शर्माने शुभेच्छा देत लिहिलं आहे,"परिणीती आणि राघव तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन. तुमच्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद कायम येऊदेत". रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, नेहा कक्कर, भूमी पेडणेकर, कनिका कपूर, नेहा धुपिया यांनीदेखील जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Parineeti Chopra Raghav Chadha: परिणीती-राघवच्या साखरपुड्याची पहिली झलक समोर! पाहा फोटो...

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 2 August 2026 : आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर; वाचा आजचे राशीभविष्य
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget