एक्स्प्लोर

Morning Headlines 13th May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

1. Karnataka Elections: आज दुपारपर्यंत कर्नाटकचा कौल स्पष्ट होणार, बेळगावातील 18 मतदारसंघांकडे विशेष लक्ष 

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील. वाचा सविस्तर 

2. Narendra Singh Tomar : भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित : कृषीमंत्री

Narendra Singh Tomar : शेतकऱ्यांची शेती शाश्वत आणि अनुकूल बनवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे वक्तव्य कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी केलं. भारताची सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि शेतकर्‍यांसाठी किंमत समर्थन प्रणाली जगात अनोखी आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या सर्वांगीण विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा भर असल्याचेही तोमर म्हणाले. भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे तोमर म्हणाले. वाचा सविस्तर 

3. Starbucks Troll on Twitter: अर्पित बनला अर्पिता... 'या' जाहिरातीमुळे स्टारबक्स ट्रोल, Boycott करण्याची होतेय मागणी

Boycott Starbucks trends on Twitter: 'समलिंगी विवाहा'वर (Same Sex Marriage) सध्या देशात चर्चा सुरू आहे. अशातच कॉफीहाऊस कंपनी स्टारबक्सनं  (Starbucks) याच मुद्द्यावर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पण याच जाहिरातीमुळे स्टारबक्स नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या जाहिरातीच्या निषेधार्थ #BoycottStarbucks हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. स्टारबक्सची जाहिरात भारतात 'समलैंगिक विवाहांना' प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून करण्यात आला आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आहे तरी काय...? वाचा सविस्तर 

4. Twitter New CEO: लिंडा याकारिनो ट्विटरच्या नव्या CEO; एलॉन मस्क यांची अधिकृत घोषणा

Twitter New CEO Linda Yaccarino: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरच्या सीईओ (CEO) पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आणि संपूर्म जगभरात एकच खळबळ माजली. आता एलॉन मस्क काय करणार? ते खरंच सीईओ पद सोडणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. अशातच एलॉन मस्क यांनी स्वतः ट्वीट करत ट्विटरला नव्या सीईओची गरज आहे आणि एक महिला ट्विटरची सूत्रं हाती घेईल, असं ट्वीट केलं होतं. आता एलॉन मस्क यांनी पुन्हा एक ट्वीट करुन ट्विटरच्या नव्या सीईओच्या नावाची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर 

5. Air India: प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, मैत्रिणीला चक्क विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवलं; पायलट तीन महिन्यांसाठी निलंबित, एअर इंडियाला 30 लाखांचा दंड

Air India: आपण प्रवास करताना अनेकदा बसचालक हलगर्जीपणा करत असल्याचं निदर्शनास येतं. त्यावेळी लोकांच्या सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखवणाऱ्या त्या चालकाला किंवा वाहकाला शिव्यांची लाखोली वाहिली जाते. पण हाच निष्काळजीपणा जर हवेत असणाऱ्या विमानामध्ये दिसला तर तर आपली काय परिस्थिती होईल यांचा अंदाज व्यक्त न केलेला बरा. असाच काहीसा प्रकार एअर इंडियाच्या दुबईहून दिल्लीला येणाऱ्या विमानात घडलाय. पायलटने आपल्या मैत्रिणीला चक्क विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवलं आणि प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली. वाचा सविस्तर 

6. Kolkata: डास चावल्याने मुलाचा मृत्यू झाला, विम्याचे पैसे मिळावे म्हणून आईची न्यायालयात धाव; न्यायाधीश म्हणाले.... 

कोलकाता: डास चावल्याने झालेला मृत्यू हा कोणताही अपघात नाही, त्यामुळे अपघाती मृत्यू झाल्यानंत जो विमा मिळतो तो मिळणार नाही असं कोलकाता उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. डास चावल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटंबीयांनी विमा रक्कम मिळावी अशी मागणी करत न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे स्पष्ट केलं. वाचा सविस्तर 

7. 13th May In History: लेखक आर. के. नारायण, नाटककार बादल सरकार यांचे निधन; आज इतिहासात

13th May In History:  आज इतिहासात अनेक घडामोडी घडल्या आहेत. आजच्या दिवशी सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक पटलावर दखल घेण्याजोग्या घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी 1952 मध्ये स्वतंत्र भारतातील संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याशिवाय इतरही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. वाचा सविस्तर 

8. Horoscope Today 13 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

Horoscope Today 13 May 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. वृश्चिक राशीच्या लोकांची एखाद्या जुन्या मित्रासोबत अचानक भेट होईल, ज्यांच्यासोबत जुन्या आठवणी ताज्या होतील. तर, धनु राशीला नोकरीत चांगली संधी मिळेल. मेष ते मीन राशीसाठी शनिवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीलाDhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Embed widget