एक्स्प्लोर

Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं

Dhule Crime News: नाशिकमधल्या पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये आई, वडील आणि मुलीने सोबत आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सगळेजण चक्रावले आहेत. गिरासे कुटुंबीयांनीच एकत्रच आयुष्य संपवल्याने खळबळ

धुळे: नाशिक शहराच्या पाठोपाठ धुळे शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. शहरातील प्रमोद नगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई-वडिलांसह दोन मुलांनी आत्महत्या (Suicide News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे धुळे (Dhule News) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कुटुंबाचे प्रमुख असणारे प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान असून पत्नी आणि दोन मुलांसमवेत ते प्रमोद नगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते. मात्र, मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसत होते. प्रवीण गिरासे यांची बहीण या आज सकाळच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आला होता. तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

या चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे धुळ्यातील समर्थ कॉलनीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी सोन्यासारख्या दोन लेकरांसह आत्महत्या का केली असावी, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलीस तपासातून या सगळ्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

मृतांची नावे

प्रवीण मानसिंग गिरासे

दीपा प्रवीण गिरासे

मितेश प्रवीण गिरासे

सोहम प्रवीण गिरासे

नाशिकमध्ये बॉश कंपनीच्या कर्मचाऱ्याची कुटुंबासह आत्महत्या

नाशिकमधील गौळने गावातील बॉश कंपनीत काम करणाऱ्या विजय सहाने यांनी आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली होती. विजय सहाने हे गेल्या बारा वर्षांपासून बॉश कंपनीत कामाला होते. त्यांनी आपली पत्नी आणि नऊ वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या केली. विजयच्या कुटुंबीयांनी बॉश कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विजय सहाने अस्वस्थ होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत कुटुंबीयांनी यासाठी बॉश कंपनीला जबाबदार धरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र, अद्याप बॉश कंपनीकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

आणखी वाचा

बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप

धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
शॅम्पूच्या बाटल्यांमधून कोकेनची तस्करी, राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटीं 26 लाखांचे कोकेन जप्त
शॅम्पूच्या बाटल्यांमधून कोकेनची तस्करी, राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटीं 26 लाखांचे कोकेन जप्त
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Shivsena Nanded news: शिवसैनिकांनी 'त्या' आमदाराविरोधात खदखद बोलून दाखवली, श्रीकांत शिंदे सर्वांदेखत म्हणाले, 'हा पक्ष एकनाथ शिंदे चालवतयात...'
शिवसैनिकांनी 'त्या' आमदाराविरोधात खदखद बोलून दाखवली, श्रीकांत शिंदे सर्वांदेखत म्हणाले, 'हा पक्ष एकनाथ शिंदे चालवतयात...'
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
Embed widget