एक्स्प्लोर

Morning Headlines 4th May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

1. जंतर-मंतरवर 'मिड नाईट ड्रामा'; पोलिसांकडून जीवघेण्या हल्ला झाल्याचे कुस्तीपटूंचे आरोप, पोलीस म्हणतात, "किरकोळ वाद, परिस्थिती नियंत्रणात"

Wrestlers Delhi Police Ruckus: दिल्लीत (Delhi) जंतरमंतरवर (Jantar Mantar) धरणं आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. बुधवारी (3 मे) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि पोलीस (Delhi Police) यांच्यात वादावादी आणि हाणामारी झाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. कुस्तीपटूंचा आरोप आहे की, पावसामुळे त्यांनी बेड्स मागवले होते, जे पोलिसांनी आणण्यापासून रोखले. स्टार खेळाडू बजरंग पुनिया आणि पोलीस यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओही समोर आला आहे. तसेच, कुस्तीपटू विनेश फोगट एका व्हिडीओमध्ये रडताना दिसत आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिनं घडल्या प्रकारासंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांचंही वक्तव्य समोर आलं आहे. वाचा सविस्तर 

2. Goa News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अडचणीत वाढ; परप्रांतीय कामगारांबाबतच्या वक्तव्यामुळे बिहारमध्ये गुन्हा दाखल

Case Filed Against Goa CM Dr. Pramod Sawant: गोव्याचे (Goa News) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांच्याविरोधात पाटणा, बिहार (Bihar) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात परप्रांतीय बिहारी कामगारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे (JDU) नेते मनिष सिंह (Manish Singh) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मनीष सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांनी बिहारमध्ये येऊन आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बिहारींची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. वाचा सविस्तर 

3. Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आता सुनावणी थेट जुलैमध्ये?

Local Body Elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Maharashtra Local Body Elections) सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) नियोजीत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुनावणीचा समावेश करण्यात आलेला नाही. आता थेट उन्हाळी सुट्टीनंतर जुलै महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरी असल्याचं बोललं जात आहे. अशातच पुढे न्यायालयाला उन्हाळी सुट्ट्या आहेत, त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची सुनावणी थेट जुलै महिन्यातच होण्याची शक्यता वर्तवण्याच येत आहे. दरम्यान, 20 मे पासून सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. वाचा सविस्तर

4. Cyclone Mocha : अस्मानी संकट! वर्षातील पहिले चक्रीवादळ धडकणार, बंगाल - ओडिसाला हाय अलर्ट जारी

Cyclone Mocha:  बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात 9 मेपर्यंत चक्रीवादळ (Mocha Cyclone) निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यामुळे मच्छीमारांनी या भागात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळ मध्य बंगाल उपसागराच्या दिशेने उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. यामुळे आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे  2023 सालातील हे पहिले चक्रीवादळ आहे. वाचा सविस्तर 

5. Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची कामगिरी, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir:  भारतीय लष्करांकडून दहशतवाद्यां ना जशास तसे उत्तर दिले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लाच्या क्रिरी गावा झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा जवानांनी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक एके 47, एक पिस्टल दहशतवाद्यांकडून मिळाले आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे. वाचा सविस्तर 

6.US Inflation : फेड रिझर्व्हने पुन्हा एकदा दर 0.25 टक्क्यांनी वाढवला, आणखी वाढ न करण्याचे दिले संकेत

US Inflation : जगातील महासत्ता असलेला देश अशी अमेरिकेची (America) ओळख आहे. पण, जगातील इतर देशांप्रमाणेच आता अमेरिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने मुख्य कर्ज दर  0.25 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे तसेच हे दर आणखी न वाढविण्याचे संकेतही दिले आहेत. या निर्णयाने यूएस मध्यवर्ती बँकेचा बेंचमार्क रातोरात 5-5.25 टक्के व्याजदराच्या श्रेणीत पोहोचला आहे. मार्च 2022 पासून यूएस फेडची ही सलग दहावी वाढ नोंदविण्यात आली आहे. वाचा सविस्तर 

7. 4th May In History: या जगण्यावर शतदा प्रेम करायला लावणाऱ्या अरुण दातेंचा जन्म, टिपू सुलतानचा मृत्यू; आज इतिहासात

4th May In History: आजचा दिवस हा देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हैसुरचा वाघ अशी ओळख असलेला टिपू सुलतान धारातिर्थी पडला. श्रीरंगपट्टनच्या लढाईत ब्रिटिशांनी त्याला ठार मारलं. तर भावगीताच्या इतिहासातही आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असा संदेश देणारे गायक अरुण दातेंचा जन्मही आजच्याच दिवसाचा. वाचा सविस्तर 

8. Horoscope Today 4 May 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 4 May 2023 : आज गुरुवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यांसह सर्व राशींना सुख आणि समृद्धी मिळेल. आजच्या दिवशी कोणत्या राशीला यश मिळेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget