एक्स्प्लोर

Morning Headlines 8th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

मनोज जरांगे आज छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात; जल्लोषात स्वागत होणार, सप्तशृंगी देवीचेही दर्शन घेणार 

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निघालेल्या अध्यादेशानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. याच दौऱ्यादरम्यान आज मनोज जरांगे (Manoj Jarange) छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) बालेकिल्ल्यात धडकणार आहेत. जरांगे हे आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे याच दौऱ्यात मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी जरांगेंचे जल्लोषात स्वागत करत जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले जाण्याची शक्यता आहे. याच दौऱ्यात मनोज जरांगे हे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शनही घेणार आहे. त्यामुळे जरांगे यांचा आजचा नाशिक दौरा चर्चेत आला आहे. वाचा सविस्तर 

Rohit Pawar ED Inquiry: रोहित पवारांची आज  ईडी चौकशी; पवारांकडून कागदपत्रे सादर केले जाणार 

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार असून, आज काही कागदपत्रे रोहित पवार ईडीकडे जमा करण्याची शक्यता आहे. एका कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांची मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील रोहित पवारांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे. सविस्तर वाचा

देशात बेरोजगारीचे प्रमाण कमी, बेरोजगारीचा दर 6 टक्क्यांवरुन 3.2 टक्क्यांवर, अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती 
देशात वाढणारी महागाई (inflation) कमी करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. विविध उपायोजनाद्वारे सरकार महागाई नियंत्रणात आणत आहे. अशातच देशात बेरोजगारीचा (unemployment) दर देखील कमी झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी दिली. सीतारामन यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6 टक्के होता, जो 2022-23 मध्ये 3.2 टक्क्यांवर आला आहे. सीतारामन यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. एकीकडे कामगार संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे बेरोजगारीचे प्रमाणही कमी झाल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. वाचा सविस्तर 

Uttarakhand UCC Bill : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा विधेयक मंजूर; राज्यात नेमका काय बदल होणार?

Uttarakhand UCC Bill : उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समान नागरी संहिता (Uttarakhand UCC Bill) विधेयक सभागृहात मंजूर केलं आहे. उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक मंजूर झाल्यानंतर, उत्तराखंड समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. भाजपच्या सर्व आमदारांनी आवाजी मतदानाने यूसीसी विधेयक मंजूर केले, हा प्रस्ताव 80 टक्के संमतीने मंजूर करण्यात आला. वाचा सविस्तर

मायक्रोसॉफ्ट तब्बल 20 लाख भारतीयांना देणार AI ट्रेनिंग; सीईओ सत्या नडेला यांची मोठी घोषणा

सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच AI ची जगभरात चर्चा होतेय. याच कारणाने सॅमसंग मोबाईल कंपनीनेसुद्धा आपल्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) AI फीचरचा समावेश केला आहे. याशिवाय अनेच चांगल्या-वाईट कामांमध्ये AI टेक्नॉलॉजीचा (Technology) वापर केला जातोय. भारतामध्ये सुद्धा AI टेक्नॉलॉजीचा वापर सुरु झाला आहे. मायक्रोसॉफ्ट एआय टेक्नॉलॉजी खूप वेगाने विकसित करतेय. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान त्यांनी मोठी घोषणा आहे. वाचा सविस्तर

पाकिस्तानमध्ये आज मतदान, पुन्हा नवाज शरीफ सरकार स्थापन होण्याची शक्यता? 

Pakistan General Election : पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंसाचाराचे वातावरण असतानाच दुसरीकडे आज देशभरात सर्वत्रिक निवडणूक (General Election) होत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) तुरुंगात असल्याने नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) आणि बिलावल भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात मुख्य लढत समजली जात आहे. या शर्यतीत नवाझ शरीफ आघाडीवर असून ते चौथ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना लष्कराकडून मिळणारा मोठा पाठींबा मिळत असल्याची चर्चा आहे. आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात होणार असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रकिया सुरु राहणार आहे. वाचा सविस्तर

MS Dhoni: ना रोहित, ना विराट... भारताचा बेस्ट कॅप्टन कोण? मोहम्मद शामीच्या उत्तराने मनं जिंकली 

आतापर्यंत अनेक खेळाडूंनी भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवले आहे. प्रत्येकाने टीम इंडियाला (Team India) वेगळ्या उंचीवर नेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सौरव गांगुली (Sourav Ganguly), महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यानंतर आता रोहित शर्मा (Rohit Sharma) ही जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. पण टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्याची उत्तरेही प्रत्येकाची वेगवेगळी असतील. पण हात प्रश्न भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याला विचारण्यात आला. यावर मोहम्मद शामी (Mohammed Shami) याने मजेशीर उत्तर दिलेय. भारताचा सर्वात बेस्ट कर्णधार कोण? या प्रश्नाचं उत्तर देताना शामी म्हणाला की,  एखाद्याला यशस्वी म्हणणे म्हणजे तुम्ही खेळाडूंची तुलना केल्यासारखं आहे. पण प्रत्येकाच्या यशावर नजर टाकली तर धोनीला सर्वोत्कृष्ट म्हटले जाईल. वाचा सविस्तर

Propose Day 2024: सांग प्रिये, माझी होशील ना? 'प्रपोज डे'ची संधी साधा आणि मनातलं सांगून टाका; आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याचे सात सोपे मार्ग

Valentine's Week 2024 : फेब्रुवारीच्या महिन्यातील व्हॅलेंटाईन्स वीक हा अनेकांसाठी विशेष, त्यातल्या त्यात प्रपोज डे हा तर अधिक खास. 'व्हॅलेंटाईन डे'ची (Valentine's Day)  सुरुवात 'रोज डे'ने सुरू झाल्यानंतर त्याच्या पुढचा दिवस म्हणजे प्रपोज डे (Propose Day). आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातील भावना सांगण्याचा आजचा दिवस. वर्षभर आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यास धजावत नसलेल्या प्रेमविरांसाठी आजचा दिवस हा काहीसा धीर देणारा. धाडस करुन प्रेम व्यक्त करु इच्छिणारे अनेक तरुण-तरुणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. वाचा सविस्तर

Horoscope Today 8 February 2024 : आजचा गुरुवार खास! दत्तगुरुकृपेने या 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 8 February 2024 :  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य...  वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget