Technology : मायक्रोसॉफ्ट तब्बल 20 लाख भारतीयांना देणार AI ट्रेनिंग; सीईओ सत्या नडेला यांची मोठी घोषणा
AI Training : भारतामध्ये सुद्धा AI टेक्नॉलॉजीचा वापर सुरु झाला आहे. मायक्रोसॉफ्ट एआय टेक्नॉलॉजी खूप वेगाने विकसित करतेय.
AI Training : सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच AI ची जगभरात चर्चा होतेय. याच कारणाने सॅमसंग मोबाईल कंपनीनेसुद्धा आपल्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) AI फीचरचा समावेश केला आहे. याशिवाय अनेच चांगल्या-वाईट कामांमध्ये AI टेक्नॉलॉजीचा (Technology) वापर केला जातोय. भारतामध्ये सुद्धा AI टेक्नॉलॉजीचा वापर सुरु झाला आहे. मायक्रोसॉफ्ट एआय टेक्नॉलॉजी खूप वेगाने विकसित करतेय. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान त्यांनी मोठी घोषणा आहे.
मायक्रोसॉफ्ट 20 लाख भारतीयांना प्रशिक्षण देणार
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी भारत दौऱ्यावर असताना मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मायक्रोसॉफ्ट भारतातील 2 मिलिन म्हणजेच 20 लाखांहून अधिक लोकांना AI ची ट्रेनिंग देणार आहेत. पुढे ते म्हणाले की, मायक्रोसॉफ्टने हे पाऊल भारतातील तरूणांना अधिक सक्षम करण्यासाठी उचलले आहे. यामुळे देशात आणखी रोजगार वाढेल असंही ते म्हणाले.
AI ला माणसांची गरज भासेल : अर्थमंत्री
1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले होते की, AI तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढणार आहे. पण, AI वापरण्यासाठी माणसांचीही तितकीच गरज भासणार आहे. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर, सत्या नडेला यांच्या या घोषणेवरून स्पष्टपणे दिसून येतंय की, येत्या काळात भारतातील लोकांनी रोजगार मिळवण्यासाठी एआयचे प्रशिक्षण घेणे किंवा त्याऐवजी एआय कौशल्ये शिकणे खूप महत्त्वाचे असेल.
काय म्हणाले सत्या नडेला?
नडेला म्हणाले, "नवीन कौशल्य विकासासाठी एक नवीन उपक्रम जाहीर करताना मला खूप आनंद होतोय. आम्ही भारतातील 20 लाखांहून अधिक लोकांना AI कौशल्ये शिकवणार आहोत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी ही कौशल्य शिकणं फार गरजेचं आहे. तसेच, यातून फक्त कौशल्यच शिकता येणार नाही तर तरूणांना नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होतील." ते पुढे म्हणाले की, भारतीय ब्रँड Kaarya च्या टीमशी संवाद साधून मला खूप प्रेरणा मिळाली. Kaarya या भारतातील स्थानिक कंपनीने ग्रामीण भारतातील उत्पन्नाचे स्रोत प्रदान करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट रिसर्चचा वापर केला आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी कार्याचे काम पाहिल्यानंतर एआयने निर्माण केलेल्या संधींचा वापर करून ग्रामीण भारतात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देऊ असा दावाही त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :