एक्स्प्लोर

Propose Day 2024: सांग प्रिये, माझी होशील ना? 'प्रपोज डे'ची संधी साधा आणि मनातलं सांगून टाका; आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याचे सात सोपे मार्ग

Propose Day 2024: व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा आजचा दिवस म्हणजे खासच.

Valentine's Week 2024 : फेब्रुवारीच्या महिन्यातील व्हॅलेंटाईन्स वीक हा अनेकांसाठी विशेष, त्यातल्या त्यात प्रपोज डे हा तर अधिक खास. 'व्हॅलेंटाईन डे'ची (Valentine's Day)  सुरुवात 'रोज डे'ने सुरू झाल्यानंतर त्याच्या पुढचा दिवस म्हणजे प्रपोज डे (Propose Day). आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातील भावना सांगण्याचा आजचा दिवस. वर्षभर आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यास धजावत नसलेल्या प्रेमविरांसाठी आजचा दिवस हा काहीसा धीर देणारा. धाडस करुन प्रेम व्यक्त करु इच्छिणारे अनेक तरुण-तरुणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.

प्रपोज डे म्हणजे खास दिवस, आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज कशा पद्धतीनं करायचं हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मग अशा व्यक्तींसाठी काही खास पर्याय आहेत. त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करु शकता.

सुंदर ठिकाणी अथवा निसर्गाच्या सानिध्यात प्रपोज करा

तुमच्या आवडत्या व्यक्तीला तिच्या आवडत्या, सुंदर ठिकाणी प्रपोज कराल, तुमचे प्रेम वेगळ्या अंदाजात व्यक्त कराल तर ते अधिक चांगलं ठरेल. तर मग तुमच्या आवडत्या व्यक्तीला एखाद्या सुंदर ठिकाणी घेऊन जा. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या आणि जोडीदाराच्या आयुष्यात कायम लक्षात राहील.

मेरा प्रेम पत्र पढके

पूर्वीच्या काळी प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्राचा सर्वाधिक वापर केला जायचा. आज प्रेम पत्र देणं ही गोष्ट जुनी झाली असली तरी एक वेगळी कल्पना होऊ शकते. सुंदर अशा काव्यात्मक शब्दांच्या माध्यमातून आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त करु शकता. त्यात शायरी वा गाण्यांच्या काही ओळींचा वापर केलात तर ते अधिक खास ठरू शकेल.

सुंदर असं एक गिफ्ट द्या

आपल्या आवडत्या व्यक्तीला सुंदर असं गिफ्ट देणं, सुंदर फुल देणं प्रत्येकालाच आवडेल. त्यामुळे समोरची व्यक्ती आनंदित होईल. तुम्हीही तुमच्या आवडत्या व्यक्तीला एखादं गिफ्ट आणि त्या सोबत गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करु शकता. तसंच शायरी किंवा कवितेचा वापर केला तर मग तुम्हाला प्रेमात यश मिळण्याची जास्त शक्यता आहे. 

लंच किंवा डिनर डिप्लोमसी

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रपोज करताय तर त्या व्यक्तीला लंच किंवा डिनरला घेऊन जाणं कधीही चांगलं. त्यातही जर कॅन्डल लाईट डिनरचा बेत आखला तर सोन्याहून पिवळं. त्या ठिकाणी डेजर्ट किंवा वाईनच्या सोबतीने तुम्ही त्या व्यक्तीला अंगठी देऊन प्रपोज करु शकता.

भन्नाट कल्पना राबवा

आजचा दिवस वेगळा करण्यासाठी तुम्ही काही वेगळी कल्पना निवडू शकता. जसं तुम्ही तुमच्या पार्टनरचे आतापर्यंतचे सर्व फोटो एकत्र करुन त्याचा अल्बम करु शकता आणि तो गिफ्ट करु शकता. त्या अल्बमच्या माध्यमातून आपण आपले प्रेम व्यक्त करु शकता.

फिल्मी डायलॉगचा वापर 

आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला फिल्मी डायलॉगच्या माध्यमातून प्रपोज करु शकता. जसं 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील एक सुंदर डायलॉग आहे, 'एक मर्द का सिर तीन औरतों के आगे झुकता है! मॉं के आगे, एक दुर्गा मॉं के आगे और तुम'.

'फना चित्रपटातील एक डायलॉग आहे, 'हमसे दूर जाओगे कैसे, दिल से हमें भुलाओगे कैसे, हम वो खुशबू हैं, जो सांसों में बसते हैं, खुद की सांसों को रोक पाओगे कैसे.' तसेच 'कल हो ना हो' या चित्रपटातील एक डायलॉग आहे, 'प्यार तो बहुत लोग करते है, लेकिन मेरे जैसा प्यार कोई नही कर सकता, क्युंकी किसी के पास तुम जो नहीं हो.' अशा काही डायलॉगचा वापर केल्याने तुमचे प्रपोज अधिक खुलण्याची शक्यता आहे.

हात हातात घ्या अन् 

तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करताना तिचा हात हातात घ्या, नजर नजरेला भिडवा आणि आत्मविश्वासाने तिला प्रपोज करा. प्रेमळ स्पर्श हा तुमचं प्रेम अधिक खुलवेल आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण होईल.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget