एक्स्प्लोर

Horoscope Today 8 February 2024 : आजचा गुरुवार खास! दत्तगुरुकृपेने या 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य..

Horoscope Today 8 February 2024 :  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य... 

मेष (Aries Today Horoscope)

आजचा दिवस ना चांगला ना वाईट  संमीश्र फळ देणारा आहे . नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आळशीपणामुळे केलेले काम आज बिघडू शकते. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, जर तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित कर्ज घेण्याची योजना आखली असेल, तर आज तुमच्या कर्जाशी संबंधित काम होऊ शकते. तरुणांबद्दल सांगायचे तर  आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.  तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर जर तुम्ही नशा, तंबाखू, गुटखा इ.चे सेवन करत असाल तर तुम्हला यकृत किंवा किडनीशी संबंधित  समस्या तुम्हाला उद्भवू शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.  

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर ऑफिसमध्ये अनावश्यक चर्चा करणे टाळा आणि कोणाबद्दलही  वाईट बोलू नका.  व्यावसायिकांबद्दल सांगायचे  तर व्यवसाय करत असतील किंवा कोणताही करार करत असाल तर तुम्ही आज अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.  समोरची व्यक्ती तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न देखील करू शकते.  ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. तरुणांबद्दल सांगायचे तर  तुम्ही तुमच्या करिअरकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोणतीही वस्तू खरेदी करताना  काळजी घ्या.  स्वयंपाकघरातील वस्तू खरेदी करू नये.  आरोग्याविषयी बोलायचे तर  तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.  आवश्यकतेशिवाय घराबाहेर  पडणे टाळा.  घरातील कामामध्ये मदत करा.  तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर  तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहावे, कोणतेही काम पूर्ण करण्यात घाई करू नये, अन्यथा घाई केल्याने तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळू शकतात. व्यावसायिकांबद्दल सांगायचे तर, जर व्यावसायिकांनी फॅशन डिझायनिंगशी संबंधित काम केले तर त्यांना ते काम अधिक उत्पन्न मिळू शकते. तरुणांबद्दल बोलायचे तरतुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा, तो जे काही बोलेल त्यात व्यत्यय आणू नका, त्याचे संपूर्ण बोलणे ऐकूनच कोणतीही प्रतिक्रिया द्या. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे तर जर डॉक्टरांनी तुम्हाला कोणत्याही आजारामुळे काही गोष्टी  वर्ज्य करण्याचा सल्ला दिला असेल, तर तुम्ही त्या गोष्टी वर्ज्य करा.  तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक  आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखले पाहिजे. तरच आयुष्यात पुढे जाता येईल. घरातील कामांमध्ये ऑफिसचे काम आणू नका. ऑफिसची कामे ऑफिसमध्येच हाताळण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घ्यावा. जर आपण तरुण लोकांबद्दल बोलायचे तर  तुमच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल. वैवाहिक जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींना महत्त्व देऊ नका, तरच तुमच्या वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. आज छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक  गोष्टीची काळजी करू नका. अन्यथा अतिविचाराने आपण एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता, कारण कोणत्याही परिस्थितीत, चिंता ही चितेसारखी असते, म्हणून आपण कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक काळजीपासून दूर राहावे, तरच आपले आरोग्य निरोगी राहाल.

सिंह (Leo Today Horoscope) 

आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या क्षमतेचा अधिक चांगला वापर केला पाहिजे, तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप खूश होतील. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्या लोकांचे कुटुंबातील सदस्यांशी काही मुद्द्यावर मतभेद असू शकतात, त्यामुळे तुम्ही कौटुंबिक कलहापासून दूर राहावे, कारण वडिलोपार्जित व्यवसायात सर्व सदस्यांना बोलण्याचा  सूचना देण्याचा अधिकार आहे. तरुणांबद्दल सांगायचे तर, त्यांच्या जीवनात यश मिळविण्यासाठी त्यांनी आपल्या गुरुंशी चर्चा करावी.   यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्या मुलाच्या शिक्षणावर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. तुम्ही थोडे चिंतेत असाल, त्यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अगोदरच करावी लागेल, अन्यथा तुमच्या मुलांच्या शिक्षणात आर्थिक अडथळे येऊ शकतात. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर  मलेरिया, फूड पॉयझनिंग यांसारख्या आजारांपासून तुमचे संरक्षण होईल, तुमच्या आहारात संतुलन वाढवा, हलके अन्न खा आणि फळे खा. 

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज तुमच्या कामाच्या ठिकाणी बोलण्याच्या सवयीमुळे तुमची अनेक महत्त्वाची कामे चुकू शकतात. त्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.  त्यामुळे दैनंदिन कामांची यादी तयार करून पूर्ववनियोजन करावे.  व्यापाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना  ग्राहकांशी संपर्क ठेवा. ,   तुमच्या ओळखीच्या लोकांशी वेळोवेळी बोलत राहा,जेणेकरून तुमच्या व्यवसायाला चालना मिळू शकेल. जर आपण तरुणांबद्दल बोललो, तर त्यांनी डिजिटल चलन म्हणजेच क्रेडिट कार्डे अत्यंत मर्यादित प्रमाणात वापरल्यास ते तुमच्यासाठी चांगले होईल. आज जास्त रागावू नका, नाहीतर अडचणीत सापडू शकता. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर आज तुम्हाला मानसिक ताण टाळावा लागेल, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते. मानसिक तणाव आरोग्यासाठी चांगला नाही. तुमचे लक्ष वळवण्यासाठी तुम्ही तुमची आवडती कामे करू शकता. ज्यामुळे तुमचा मानसिक ताण दूर होईल.   

कन्या (Virgo Today Horoscope) 

दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर त्यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल, अन्यथा, काही काम पूर्ण न झाल्यामुळे, तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून फटकारावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलतांना, व्यावसायिकांनी आज षडयंत्रांपासून सावध रहावे, अन्यथा कोणीतरी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते.  तरुणांबद्दल बोलायचे झाले तर मन एखाद्या गोष्टीबद्दल अधिक चिंताग्रस्त होऊ शकते, जे लोक त्यांना आवडत नाहीत त्यांना आज खूप त्रास होऊ शकतो ज्यामुळे तरुणांचे मन अस्वस्थ होऊ शकते.  तुम्ही सत्संग, हवन कीर्तन, कथा, धार्मिक पुस्तके वाचणे याकडे जरूर लक्ष द्या.  आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, थायरॉईडच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी आणि कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या गोष्टी खाणे टाळावे. तरच तुमचे शरीर निरोगी राहू शकते. 

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

 नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज तुमच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी तुमच्या आमंत्रणावरूनच आल्याचा अनुभव येईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, जर तुम्ही व्यवसायाबाबत काही तडजोड करत असाल तर तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण समोरची व्यक्ती तुमची हानी करू शकते, तुमची फसवणूक करण्याचाही प्रयत्न करू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. तरुणांबद्दल बोलायचे तर आजचा दिवस तरुणांसाठी चांगला असेल. जर तुम्ही सामाजिक कार्याशी निगडीत असाल तर आज तुम्हाला तुमचा तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळू शकते.  तुमच्या जोडीदाराबरोबर छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतात. शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शांत राहून ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करू शकता. आज तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही कंबरेचा पट्टा बांधा आणि वाकून काम करू नका, थोडा व्यायाम देखील करा, तरच तुम्हाला आराम मिळेल. 

धनु (Sagittarius Today Horoscope)

आजचा दिवस चांगला जाईल, जर आपण काम करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर वरिष्ठ तुमच्या खूश असतील.  व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही तुमचे बजेट अगोदरच तयार करा आणि मगच एखाद्या कामात पैसे गुंतवण्याची योजना करा. विद्यार्थ्यांबद्दल सांगायचे तर, पुढील शिक्षणाशी संबंधित कोणतीही योजना तयार करण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल.आत्ताच त्यासाठी काम सुरू करू शकता. तुमच्यासाठी हा सर्वात योग्य काळ असेल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर तुमच्या घरात तुमचे आजी आजोबा किंवा इतर कोणी वृद्ध लोक राहत असतील तर तुम्ही त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर ते थोडेसे अस्वस्थ वाटत असतील तर  त्यांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. अगदी थोडीशी समस्या असल्यास, एखाद्याने डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे, कारण समस्या असल्यास एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा जाणवू शकतो. 

मकर (Capricorn Today Horoscope)

 जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर आजचा दिवस नैराश्यात जाईल.  व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर  तुम्ही तुमचा व्यवसाय खूप पुढे नेऊ शकता आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकेल. तरुणांबद्दल सांगायचे तर तुम्हाला यश मिळेल.  ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण खूप आनंददायी असेल. घरात सुरक्षिततेची खबरदारी घ्या, तुमच्या घरातील काही मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची किंवा गायब होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे तुम्ही खूप काळजीत पडू शकता, म्हणून यासाठी आवश्यक उपाययोजना कराय ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे. . त्यांनी आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा बाळगू नये, अन्यथा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज तुम्ही तुमच्या कार्यालयातील तुमच्या सहकाऱ्यांशी तसेच तुमच्या वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहावे.  अन्यथा अनावश्यक संभाषण वादाचे रूप घेऊ शकते आणि तुम्हाला नोकरीत अडचणींना सामोरे जावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर व्यवसायात नुकसान होत असेल तर तुम्ही तोटा कमी करण्यासाठी काही नियोजन करू शकता.  यामुळे तुमचे नुकसान थांबू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर नवरा-बायको दोघे वेगवेगळ्या शहरात राहत असतील तर तुम्ही फोनवर एकमेकांशी बोलत राहा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर तुमची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब असेल तर आज तुमची प्रकृती सुधारू शकते. आजपासून तुम्हाला आराम मिळेल. 

मीन  (Pisces Today Horoscope)

नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही डॉक्टरांच्या कामाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्या, कोणतेही कार्यालयीन काम अतिशय काळजीपूर्वक करा.  ते काम करताना उशीर झाला तरी चालेल.  कोणत्याही प्रकारची चूक करू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही भागीदारीत कोणतेही काम करत असाल तर तुमचा  जोडीदारासोबत एखाद्या मुद्द्यावर वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला थोडी काळजी वाटेल, विद्यार्थ्यांनी अभ्यासात मनापासून मेहनत घेतली पाहिजे, तरच ते यश मिळवू शकतात आणि परीक्षेत चांगले निकालही मिळवू शकतात. आरोग्याविषयी सांगायचे तर, जे काही आजार तुम्हाला दीर्घकाळ त्रास देत होते, आजपासून तुम्हाला आराम वाटू शकेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget