एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Morning Headlines 13th August : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

भारत आणि चीनमध्ये उद्या कमांडर स्तरावर चर्चा होणार, सीमेवरील तणाव कमी करण्याचा आणखी एक प्रयत्न

India-China Standoff : भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी चर्चेचे मार्ग खुले ठेवले आहेत. या अंतर्गत उद्या म्हणजे 14 ऑगस्ट रोजी भारत आणि चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे. यादरम्यान लडाखच्या (Ladakh) पूर्व सीमेवरील कोंडी संपवण्याच्या दिशेने दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. वाचा सविस्तर

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात जास्त लोकप्रिय कोण? भाजप आणि काँग्रेसमध्ये युद्ध

PM Modi Vs Rahul Gandhi: संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी (12 ऑगस्ट) काँग्रेस आणि भाजपमध्ये नवं युद्ध सुरु झालं. यावेळी हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेशी संबंधित होतं. दोन्ही नेत्यांमध्ये कोण जास्त लोकप्रिय आहे, यावरुनच लढाई झाली. या लढाईचं शस्त्र बनंल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील दोन्ही नेत्यांचे युझर एंगेजमेंट. वाचा सविस्तर

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी बारामतीच्या शेतकरी दाम्पत्याला निमंत्रण

Independence Day : मंगळवारी देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, लाल किल्ल्यावर दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून केलेलं भाषण ऐकण्यासाठी देशभरातील अनेकांना निमंत्रित केलं जातं. यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटना योजनेच्या 24 लाभार्थ्यांना 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या समारंभाला बोलावण्यात आलं आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील खताळपट्टा येथील अशोक सुदाम घुले या दाम्पत्याची निवड करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

एक जिल्हा एक उत्पादन  सुरु करण्यासाठी दीनदयाल अंत्योदय योजनेसोबत सहकार्य करार, स्थानिकांना स्वयंपूर्ण करण्याचा उद्देश 

One District One Product : एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) आणि दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान यांच्यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन  सुरू करण्यासाठी सहकार्य करार झाला आहे. एक जिल्हा एक उत्पादनची सुरुवात करण्यात आली आहे. जगासमोर भारतीय हस्तकलेचे वेगळेपण दाखवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल असल्याचे मत भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण उपजीविका विभागाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंग यांनी व्यक्त केले. वाचा सविस्तर

मानव कल्याण आणि हत्ती संवर्धन यांचा मेळ साधण्यासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालय कटिबद्ध : मंत्री भूपेंद्र यादव

Bhupender Yadav : पर्यावरणीय कल्याण आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या आर्थिक विकासात जैवविविधता संवर्धनाला मुख्य प्रवाहात आणण्यावर विशेष भर दिला असल्याचे मत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केले. मानव कल्याण आणि हत्ती संवर्धन यांचा मेळ साधण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. वन्य आशियाई हत्तींची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. भारत हा या प्रजातीच्या दीर्घकालीन संवर्धनाचा मुख्य आधार असल्याचे भूपेंद्र यादव म्हणाले. भुवनेश्वर येथे जागतिक हत्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वाचा सविस्तर

सोलापुरात शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर, सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर ट्रॅफिक जॅम; आज दिवसभरात

13th August Headlines : शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक झाली. सुमारे साडे तीन तास झालेल्या या बैठकीत विविध मुद्दे चर्चेला आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणावर आजही प्रतिक्रिया येण्याच्या शक्यता आहे. त्याचवेळी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरातल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाचा सविस्तर

13th August In History : जागतिक अवयवदान दिन, लेफ्ट हँडर्स डे; आज इतिहासात

13th August In History : अवयवदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि अवयवदानाबद्दल असलेल्या गैरसमजांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. या मागचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे लोकांना अवयवदान करुन अधिक जीव वाचवण्यासाठी आणि अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि शिक्षित करणे आहे. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे आणि फुफ्फुसे यासारख्या अवयवांचे दान केल्याने दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त लोकांचा जीव वाचू शकतो. वाचा सविस्तर

येणारा आठवडा 'या' राशींसाठी चांगल्या संधी घेऊन येणार! जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 14 August to 20 August 2023 : ऑगस्ट महिन्यातील हा तिसरा आठवडा मेष, मिथुन, वृश्चिक राशींसाठी चांगला जाणर आहे. तर, कर्क, कन्या, तूळ आणि धनु राशीसाठी नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात. वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget