Modi Vs Gandhi : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात जास्त लोकप्रिय कोण? भाजप आणि काँग्रेसमध्ये युद्ध, सोशल मीडियाची आकडेवारी जाहीर
Modi Vs Gandhi : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी काँग्रेस आणि भाजपमध्ये नवं युद्ध सुरु झालं. यावेळी हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेशी संबंधित होतं.
नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी (12 ऑगस्ट) काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) नवं युद्ध सुरु झालं. यावेळी हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लोकप्रियतेशी संबंधित होतं. दोन्ही नेत्यांमध्ये कोण जास्त लोकप्रिय आहे, यावरुनच लढाई झाली. या लढाईचं शस्त्र बनंल सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवरील दोन्ही नेत्यांचे युझर एंगेजमेंट.
काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनाते यांनी शनिवारी एक डेटा जारी केला ज्यात दावा केला आहे की लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधींना जास्त पसंत करतात. यासाठी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणाच्या सोशल मीडिया एंगेजमेंटचा डेटा शेअर केला. त्यांनी म्हटलं की, एक गोष्ट स्पष्ट आहे, लोक पंतप्रधान मोदींच्या जुमल्यांना कंटाळले आहेत, ते प्रेमाविषयी बोलणाऱ्या लोकनेत्याला ऐकत आहेत.
सोशल मीडियावर राहुल गांधी पुढे, काँग्रेसचा दावा
सुप्रिया श्रीनेत यांनी एका ट्वीटमध्ये दावा केला आहे की, संसद टीव्हीवर राहुल गांधींचं भाषण 3.5 लाख लोकांनी नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी (12 ऑगस्ट) काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) नवं युद्ध सुरु झालं. यावेळी हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लोकप्रियतेशी संबंधित होतं. पाहिलं, तर नरेंद्र मोदींचं भाषण 2.3 लाख लोकांनी पाहिलं. तर काँग्रेसच्या यूट्यूब चॅनलवर 26 लाख लोकांनी राहुल गांधींचं भाषण पाहिलं, तर भाजपच्या यूट्यूब चॅनेलवर 6.5 लाख लोकांनी ते पाहिलं.
श्रीनेत यांच्या दाव्यानुसार, काँग्रेसच्या फेसबुक पेजवर राहुल गांधींचं भाषण 73 लाख लोकांनी ऐकलं, तर पंतप्रधान मोदींचं भाषण केवळ 11,000 लोकांनी ऐकलं. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवर राहुल गांधींचे भाषण 23 हजार वेळा पाहिलं गेलं, तर पंतप्रधान मोदींचे भाषण 22 हजार वेळा पाहिलं गेलं.
राहुल गांधींचे ट्वीट पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त पाहिले गेले, काँग्रेसचा दावा
यासोबतच काँग्रेसने राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्या ट्वीटचा तुलनात्मक डेटाही जारी केला आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दावा केला आहे की राहुल गांधींचं शेवटचं 30 ट्वीट 481.3 लाख लोकांनी पाहिलं आहे, तर पंतप्रधान मोदींच्या शेवटच्या 30 ट्वीटला 215.9 लाख इंप्रेशन मिळाले आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमनुसार ही आकडेवारी शनिवारी संध्याकाळपर्यंतची आहे.
डेटा जाहीर करुन भाजपचं प्रत्युत्तर
पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेवरुन काँग्रेसने हल्लाबोल केल्यानंतर भाजपनेही प्रत्युत्तर दिलं. भाजपने डेटा जारी करुन सोशल मीडियावरील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुढे असल्याचा दावा केला.
गेल्या एका महिन्यात पीएम मोदींच्या अकाऊंटवर सुमारे 79.9 लाख एंगेजमेंट झाल्याचा दावा भाजपने केला आहे. दुसरीकडे, एका महिन्यात राहुल गांधींच्या ट्विटरवर 23.43 लाख एंगेजमेंट होती. गेल्या तीन महिन्यांत पीएम मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर 2.77 कोटी एंगेजमेंट होते, तर राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवर फक्त 58.23 लाख एंगेजमेंट झाली होती.
फेसबुक आणि यूट्यूबवरही पंतप्रधान पुढे, भाजपचा दावा
भाजपने फेसबुक आणि यूट्यूबचा डेटाही शेअर केला आहे. भाजपच्या दाव्यानुसार, पंतप्रधान मोदीना गेल्या एका महिन्यात फेसबुकवर 57.89 लाख युजर्स एंगेजमेंट मिळाले, तर याच काळात राहुल गांधींच्या फेसबुक पेजवर 28.38 लाख एंगेजमेंट झाले. या वर्षी पंतप्रधान मोदींच्या फेसबुकवर 3.25 कोटी एंगेजमेंट होती, तर राहुल गांधींच्या फेसबुकवर 1.88 कोटी होते.
भाजपच्या दाव्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनेलला गेल्या एका महिन्यात 25.46 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत, तर राहुल गांधींच्या यूट्यूब चॅनलला सुमारे 4.82 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. या वर्षात पंतप्रधान मोदींना यूट्यूबवर 75.79 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत, तर राहुल गांधींना 25.38 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही वाचा