एक्स्प्लोर
Most Expensive Celebrity Wedding : 'या' सेलिब्रिटींनी लग्नात खर्च केला बक्कळ पैसा, किंमत ऐकून व्हाल थक्क
Most Expensive Celebrity Wedding : बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी ग्रँड स्केल वेडिंगसाटी खूप पैसा खर्च केला आहे.

Most Expensive Indian Celebrity Wedding
1/9

Most Expensive Indian Celebrities Weddings : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षणांपैकी एक असतो. हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. काही जण यासाठी खूप पैसाही खर्च करतात.
2/9

दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत (Most Expensive Indian Celebrity Wedding) अनेक स्टार्सनी त्यांच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला, ज्याची खूप चर्चा झाली. सेलिब्रिटींच्या लग्नातील खर्चाबद्दल जाणून घ्या.
3/9

कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara Advani-Siddharth Malhotra) अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेत्रा सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 2023 मध्ये लग्न केलं. या दोघांला विवाहसोहळा राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगड महालात पार पडला ज्यासाठी सुमारे 6 कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जातं.
4/9

ज्युनियर एनटीआर-लक्ष्मी प्रणती (Jr NTR and Wife Lakshmi) ज्युनियर एनटीआर आणि लक्ष्मी प्रणती यांचं लग्न 2011 रोजी पारंपारिक पद्धतीने झालं. हैदराबादमध्ये झालेल्या त्यांच्या लग्नावर 100 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. साउथ स्टार्सपैकी हे सर्वात महागडं लग्न आहे.
5/9

कॅटरिना कैफ-विकी कौशल (Katriran Kaif-Vicky Kaushal) अभिनेत्री कॅटरिना कैफने विकी कौशलशी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये लग्न केले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील फोर्ट बरवाडा येथे दोघांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नावर 4 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या जोडप्याच्या लग्नाला फक्त 120 पाहुणे उपस्थित होते.
6/9

दीपिका पदुकोण - रणवीर सिंह (Deepika Padukone-Ranveer Singh) अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांचं इटलीतील लेक कोमो येथे लग्न झालं. या लग्नात जवळपास 95 कोटी रुपये खर्च झाले होते. या जोडप्याने यावर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.
7/9

ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन (Aishwarya Abhishek wedding) अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे 2007 मध्ये लग्न झाले. त्यावेळी या लग्नासाठी 40 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
8/9

विराट कोहली-अनुष्का शर्मा (Virat Kohli-Anushka Sharma) भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा इटलीत विवाह झाला, ज्यामध्ये 90 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
9/9

प्रियंका चोप्रा-निक जोनास (Priyanka Chopra Nick Jonas wedding) अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंग निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली. 2018 साली पार पडलेल्या या लग्नसोहळ्यासाठी 105 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
Published at : 03 Oct 2024 08:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
