एक्स्प्लोर

Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर

Mumbai Metro Line 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.5) आरे ते बीकेसी मेट्रो लाईन 3 चे लोकार्पण करण्यात आले.

Mumbai Metro Line 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज (दि.5) करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींनी मेट्रोचे लोकार्पण केल्यानंतर बीकेसी ते सांताक्रुझ असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी महिला, मेट्रोचे कामगार आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 

बीकेसी ते आरे दरम्यान किती किलोमीटरचा प्रवास?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला  मेट्रो 3 हा प्रकल्प एकूण 33.5 किलोमीटरचा आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12.44 किलो मीटरची सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई मेट्रो 3 च्या कामाला सात वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. आज त्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी या मार्गावरील काम पूर्ण झालं असून आरेमध्ये मेट्रोचं कारशेड असून बीकेसी ते सीप्झ या दरम्यान प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

तिकीट दर किती? किती वेळ लागणार? 

बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्याचं काम यापूर्वीच सुरु करण्यात आलेलं आहे. या टप्प्याचे लोकार्पण देखील पुढच्या वर्षी होईल, असे बोलले जात आहे. दरम्यान मेट्रोचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि.5) बीकेसी ते सांताक्रुझ स्टेशन दरम्यान प्रवास देखील केला आहे. आरे ते बीकेसी या दरम्यानचा प्रवास केल्यास 30 मिनीटांचा वेळ लागणार आहे. मेट्रोच्या या मार्गावर दर  साडे सहा मिनिटांनी सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. या मेट्रोची सेवा सकाळी 6.30 वाजता ते रात्री 10.30 वाजेपर्यंत सुरु राहील. तिकीट दर 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत असेल.

दिवसभरात मेट्रोच्या किती फेऱ्या? 

पीएम मोदींनी लोकार्पण केलेल्या मेट्रो 3 च्या दिवसभरात जवळपास 96 फेऱ्या होणार आहेत. या 96 फेऱ्या  आरे जेवीएलआर ते बीकेसी या दरम्यान असतील. शिवाय यामध्ये 9 मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना मेट्रोत प्रवेश मिळेल. या मेट्रोचा वेग 85 किलोमीटर प्रतितास इतका असेल, अशी माहिती आहे. 

मेट्रो किती आणि कोणत्या स्टेशनवर थांबणार? 

आरे ते बीकेसी दरम्यान 9 मेट्रो स्थानक ही उड्डाणपुलावरुन नाहीत तर भूमिगत असणार आहेत. यामध्ये बीकेसी, विद्यानगरी स्टेशन, सांताक्रुझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1, सहारा रोड,छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, मरोळ नाका, एमआयडीसी , सीप्झ स्टेशन ही मेट्रोची भूमिगत स्टेशन असणार आहेत. मुंबई मेट्रो 3 चा प्रकल्प खर्च 37 हजार 27 कोटी रुपये आहे. या मार्गिकेवर 27 स्टेशन आहेत. स्टेशन 26 स्टेशन भूमिगत असून 1 ग्रेड स्टेशन असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 08 December 2024 : Superfast News : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 08 December 2024Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 8 डिसेंबर 2024  : ABP MajhaNana Patole Full PC : आम्ही विधानसभेतील आणि रस्त्यावरीलही लढाई लढू - पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
Ind vs Aus 2nd Test : रात गयी, बात गई! सिराज- हेडच्या वादाबाबत विचारताच रोहित शर्मातील मुंबईकर जागा झाला, म्हणाला...
रात गयी, बात गई! सिराज- हेडच्या वादाबाबत विचारताच रोहित शर्मातील मुंबईकर जागा झाला, म्हणाला...
Embed widget