एक्स्प्लोर

Bhupender Yadav : मानव कल्याण आणि हत्ती संवर्धन यांचा मेळ साधण्यासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालय कटिबद्ध : मंत्री भूपेंद्र यादव

मानव कल्याण आणि हत्ती संवर्धन यांचा मेळ साधण्यासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालय कटिबद्ध असल्याचे मत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

Bhupender Yadav : पर्यावरणीय कल्याण आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या आर्थिक विकासात जैवविविधता संवर्धनाला मुख्य प्रवाहात आणण्यावर विशेष भर दिला असल्याचे मत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Minister Bhupendra Yadav) यांनी व्यक्त केले. मानव कल्याण आणि हत्ती संवर्धन यांचा मेळ साधण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. वन्य आशियाई हत्तींची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. भारत हा या प्रजातीच्या दीर्घकालीन संवर्धनाचा मुख्य आधार असल्याचे भूपेंद्र यादव म्हणाले. भुवनेश्वर येथे जागतिक हत्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

रेल्वे मार्गावर हत्तींच्या अधिवासातून जाणारे 110 महत्वपूर्ण भाग सुनिश्चित

हत्तींच्या संवर्धनाला नवीन उंचीवर नेण्यासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे यादव यांनी सांगितले. मानव कल्याण आणि हत्ती  संवर्धन यांचा मेळ साधण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय कटिबद्ध आहे, असेही यादव म्हणाले. रेल्वेबरोबर हत्तींची होणारी धडक या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC), रेल्वे मंत्रालय, राज्य वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेसारख्या राष्ट्रीय संस्थांनी घेतलेल्या एकत्रित प्रयत्नांवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, देशातील रेल्वे मार्गावर हत्तींच्या अधिवासातून जाणारे सुमारे 110 महत्वपूर्ण भाग सुनिश्चित करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. यामध्ये रेल्वेशी हत्तींची टक्कर होण्याच्या घटना कमी करण्यासाठी बहुआयामी रणनीती आखण्यात आल्या आहेत.

हत्तींची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी अभिनव उपक्रम

दरम्यान, हत्तींची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी मंत्रालयाने देशातील सर्व बंदिस्त हत्तींचे गुणसूत्रीय मॅपिंग तयार करण्यासाठी हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमावर यादव यांनी प्रकाश टाकला. मंत्रालयाने प्रथमच देशभरातील हत्ती अभयारण्यांचे व्यवस्थापन परिणामकारकता आणि मूल्यांकन करणे सुरू केल्याचे यादव म्हणाले. यासाठी देशातील चार हत्ती बहुल प्रदेशांतील चार हत्ती अभयारण्ये  सुनिश्चित करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. हत्ती अभयारण्यांमधील सर्वोत्तम पद्धतींचे प्रमाणीकरण आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल ठरेल, असे ते म्हणाले. गेल्या 2 वर्षात देशातील हत्ती अभयारण्याचे जाळे 76,508 वर्ग किमी वरून 80,777 वर्ग किमी पर्यंत वाढले असून त्यात 33 हत्ती अभयारण्यांचा  समावेश आहे, अशी माहिती यादव यांनी दिली. गज साथी तसेच मानव-हत्ती संघर्ष व्यवस्थापित करण्यात आघाडीवर असलेल्या इतर आघाडीच्या कर्मचाऱ्यांशीही यादव यांनी संवाद साधला.

गज गौरव पुरस्काराचे वितरण

जागतिक हत्ती दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून, मंत्र्यांनी प्रोजेक्ट एलिफंटने तयार केलेल्या भारतातील हत्ती कॉरिडॉरवरील अहवालाचे प्रकाशन केले. स्थानिक लोकांचा हत्तींबाबत नकारात्मक दृष्टीकोन  टाळण्यासाठी तसेच हत्तींच्या विना अडथळा हालचाली सुनिश्चित करण्यासाठी या कॉरिडॉरचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात हा अहवाल राज्य सरकारांना मदत करेल. हत्ती संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मंत्री महोदयांनी पुरस्कार विजेत्यांना गज गौरव पुरस्कार प्रदान केले.

12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन

पृथ्वीवरील सर्वात आगळ्या प्रजातींपैकी एक असणाऱ्या  हत्तींचे संरक्षण करण्याच्या मानवजातीच्या सामूहिक प्रतिज्ञेबाबत कटीबद्धता  व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात, हत्तींना राष्ट्रीय वारसा प्राणी मानले जाते आणि हत्ती आपल्या संस्कृतीत खोलवर वसलेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Viral : हाथी मेरे साथी! पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीसाठी देवदूत बनला हत्ती, पाहा कसा वाचवला जीव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
Embed widget