NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
महाराष्ट्रात एनआयए (NIA) आणि एटीएसने (ATS) मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी कृत्यात समावेश असल्याच्या संशयावरून आज पहाटेपासून राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जालना (jalna) येथून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर नाशिकच्या मालेगाव (Malegaon) येथे एनआयए, एटीएस आणि आयबी या तीन सुरक्षा एजन्सीकडून संयुक्तपणे कारवाई करत एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता ठेवण्यात आल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगावात एनआयए, एटीएस व आयबी या तीन सुरक्षा एजन्सीकडून संयुक्तिक कारवाई करण्यात आली आहे. अब्दुल्लानगर मधील एका होमिओपॅथी डॉक्टरच्या क्लिनिकवर तसेच त्याच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे.