एक्स्प्लोर
कफ सिरपसह अनेक पेन किलरवर बंदी येणार?
केंद्र सरकार कफ सिरपसह अनेक पेन किलरवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. देशातल्या सर्वोच्च अशा ड्रग अॅडवायजरी बोर्डच्या उपसमितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार निर्णय घेण्याचा विचार करत आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकार कफ सिरपसह अनेक पेन किलरवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. देशातल्या सर्वोच्च अशा ड्रग अॅडवायजरी बोर्डच्या उपसमितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार निर्णय घेण्याचा विचार करत आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार देशातल्या जवळपास 300 औषधांवर आरोग्य मंत्रालय बंदी घालण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय औषध बनवणाऱ्या कंपन्यांसोबत पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिनसारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे.
पुढील आठवड्यात अंतिम अधिसूचना जारी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात औषध कंपन्या न्यायालयाचं दार ठोठावण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement