एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई-नाशिक हायवेवर महावितरणचा टॉवर कंटेनरवर पडला, दोघांचा मृत्यू
कल्याण : मुंबई-नाशिक महामार्गावर महावितरणचा टॉवर कंटनेरवर पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
आसनगाव आणि वाशिंददरम्यान हा अपघात झाला. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने, रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या टॉवरवर कंटेनर आदळला. या घटनेत कंटनेरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर मुंबई-नाशिक हायवेवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर नाशिककडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement